Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18: 'टाइम गॉड' बनताच विवियनचा स्वॅगच बदलला, थेट 'या' दोन सदस्यांना पाठवलं जेलमध्ये

Vivian Dsena : बिग बॉसचा नवा 'टाइम गॉड' विवियन डिसेना झाला आहे. 'टाइम गॉड' बनताच त्याचे घरातील वागणे बदलले पाहायला मिळत आहे.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' च्या ( Bigg Boss 18) घरात रोज नवीन राडा पाहायला मिळत आहे. करणवीर मेहरासोबतच्या स्पर्धेनंतर फायनली विवियन डिसेना या आठवड्यात 'टाइम गॉड' झाला आहे. आतापर्यंत विवियन बिग बॉसच्या घरात दुसऱ्यांदा 'टाइम गॉड' झाला आहे.

'टाइम गॉड' झालं की अनेक अधिकार सदस्याला मिळतात. बिग बॉसने विवियनला (Vivian Dsena ) एक अग्निपरीक्षा दिली, ज्यात त्याला घरातील दोन सदस्यांना जेलमध्ये टाकायचे होते. बिग बॉसने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, घरात कोणाला जेलमध्ये पाठवायचे यावरून चर्चा पाहायला मिळत आहे. रजत बोलतो की, जेलमध्ये अशा सदस्याला ठेवा जो रेशन देईल. तर दुसरीकडून ईशा बोलते की, चाहत आणि रजत दलाल दोघही न्यूट्रल आहेत. त्यानंतर शिल्पा करण आणि रजतचे नाव घेते. तर करण चाहतचे नाव घेतो. सर्वांची मते घेऊन झाल्यावर घराचा 'टाइम गॉड' म्हणजे विवियन आपला निर्णय देतो आणि रजत दलाल आणि श्रुतिका अर्जुनला जेलमध्ये पाठवतो. यामुळे या आठवड्यात रेशन वाटपाचा अधिकार रजत दलाल आणि श्रुतिकाला मिळाला आहे.

बिग बॉसच्या घरात या आठवड्याला सात सदस्य नॉमिनेट झाले आहेत. यांपैकी 'वीकेंड का वार' ला घरातून कोण बाहेर जाणार आणि सलमान खान कोणाची शाळा घेणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे. तसेच हा 'वीकेंड का वार' खास होणार आहे. कारण या वीकेंडला घरात दिवाळी साजरी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT