Chahat Pandey SAAM TV
मनोरंजन बातम्या

Chahat Pandey : 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीनं आईला केली आलिशान गाडी गिफ्ट, किंमत ऐकून पायाखालची जमीन सरकेल

Chahat Pandey Car Price : 'बिग बॉस' फेम अभिनेत्री चाहत पांडेने आलिशान कार खरेदी केली आहे. तिच्या कारची किंमत जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'बिग बॉस 18' हे खूप गाजले. यंदा घरात खूप हटके सदस्य पाहायला मिळाले. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून धुमाकूळ घालणारी चाहत पांडे (Chahat Pandey) सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चेत आली आहे. अभिनेत्री चाहत पांडेने नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. त्याचा व्हिडीओ चाहते सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिचे नेटकऱ्यांकडून खूप कौतुक होताना पाहायला मिळत आहे.

चाहत पांडेने नवीन आलिशान कार खरेदी करून आईला गिफ्ट केली आहे. शोरूमध्ये कार घेतानाचा आणि आईला कार गिफ्ट करतानाचा चाहत व्हिडीओ शेअर केला आहे. तिने या व्हिडीओला खूप खास कॅप्शन दिले आहे. तिने लिहिलं की, "स्वप्न सत्यात उतरले. आईला नवीन कार गिफ्ट दिली. ज्या स्त्रीने मला सर्व काही दिले तिच्यासाठी मी हे करू शकते. हा क्षण तिच्यासोबत शेअर करण्यात खरोखरच भाग्यवान वाटत आहे. "

चाहतच्या कारची किंमत किती?

मीडिया रिपोर्टनुसार, चाहत पांडेने तिच्या आईला किआ कॅरेन्सची आलिशान कार गिफ्ट केली आहे. ज्याची किंमत जवळपास 10-11 लाख आहे. युर्जस कमेंटमध्ये लिहितात की, चाहतसारखी मुलगी आई-वडिलांसाठी आशीर्वाद आहे, नशीबवान आई अशा अनेक कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

'बिग बॉस 18'चा प्रवास

'बिग बॉस 18' मध्ये चाहत पांडेचा सुरूवातीपासूनच गेम चाहत्यांना खूप आवडला होता. घरात अनेक वेळा विवियन डिसेना आणि चाहत पांडेमध्ये भांडणे होत होती. 'बिग बॉस 18'मध्ये असताना चाहत पांडेने भाईजानला लग्नाची मागणी घातली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोल्हापूरात आंदोलनक शेतकऱ्यांसाठी वकील सरसावले, खटले मोफत लढवणार

Apple Benefits For Constipation: रोज सकाळी रिकाम्या पोटी खा एक सफरचंद; बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास होईल दूर

Good News: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात ₹५००० जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Saree To Ghagra : आईच्या साडीपासून बनवा गुजराती स्टाइल घागरा; नवरात्रीत तुमचा लूक दिसेल एकदम खास, वाचा ड्रेपिंगची सोपी पद्धत

WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

SCROLL FOR NEXT