Bigg Boss 18 SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 18 : 'व्हायरल भाभी'नं मोडला नियम अन् सदावर्तेंनी दाखवला कायदा, बिग बॉसच्या घरात नेमकं चाललंय काय?

Gunaratna Sadavarte- Hema Sharma : बिग बॉसच्या घरात पहिल्याचं आठवड्यात नियमांच उल्लंघन केल्याचे पाहायला मिळत आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घ्या.

Shreya Maskar

बिग बॉस (Bigg Boss 18) हिंदीची चर्चा आता सर्वत्र पाहायला मिळत आहे. बिग बॉसने तगडे कलाकार बिग बॉसमध्ये आणले आहेत. 'बिग बॉस १८' दमदार सुरुवात झालेली पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरात पहिल्या दिवसापासून वाद पाहायला मिळत आहेत. नुकताच पर्वाचा पहिला टास्क पार पडला आहे. त्यात सदस्यांनी चांगली कामगिरी न केल्यामुळे घरात रेशन देखील कमी आले आहे.

बिग बॉसच्या घरात आता नियमाचं उल्लंघन होईला सुरुवात झाली आहे. बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये तुम्ही पाहू शकता की, जेलमध्ये असलेल्या 'व्हायरल भाभी' म्हणजेच हेमाला (Hema Sharma ) जेलबाहेर बसून गुणरत्न सदावर्ते हे नंबर देताना पाहायला मिळत आहे. हेमा टिकलीच्या पाकिटवर नेल पॉलिशने नंबर लिहून घेत आहे. हेमा शर्मा नंबर लिहिताना बोलते की, "मी गुणरत्न (Gunaratna Sadavarte) यांच्याकडून आताच वीआयपी नंबर घेऊन ठेवला. " त्यावर बिग बॉस म्हणाले, बिग बॉसच्या घरात काहीही लिहिण्यास मनाई आहे. तर असं केल्यानं नियम उल्लंघन नाही का?" बिग बॉसच्या या बोलण्यावर वकील सदावर्ते म्हणतात की, मी नियम तोडल्याची चिंता करत नाही कारण मी डाकूच्या खानदानातून आलोय. मला अडचणी कशा दूर करायच्या हे माहीत आहे. कायदा माहीत आहे."

'बिग बॉस 18' गुणरत्न सदावर्ते गाढवाला घेऊन घरात आले आहेत. आता 'व्हायरल भाभी'ला काय शिक्षा होणार की नाही हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. तसेच सदावर्ते यांचा पुढचा गेम प्लान काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT