Bigg Boss 17 In Sunny Leone And Abhishek Singh Twitter
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Weekend Ka War: सनी लिओनीने बिग बॉसच्या घरात लावली हजेरी, ‘थर्ड पार्टी’च्या प्रमोशन दरम्यान सलमाननेही धरला गाण्यावर ठेका

Bigg Boss 17 Latest News: नुकतंच सोशल मीडियावर सनी आणि अभिषेकचं ‘थर्ड पार्टी साँग’ रिलीज झालं आहे. त्या गाण्याच्या प्रमोशन करिता अभिनेत्रीने बिग बॉसच्या घरात हजेरी लावली आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 In Sunny Leone And Abhishek Singh

बिग बॉसच्या १७ व्या सीझनमध्ये (Bigg Boss 17) आजच्या ‘विकेंड का वार’मध्ये (Weekend Ka War) अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leone) आणि गायक अभिषेक सिंग (Abhishek Singh) यांनी एकत्रित हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर ‘थर्ड पार्टी साँग’ (Third Party Song) रिलीज झालं आहे. या गाण्याच्या प्रमोशन करिता अभिनेत्रीने शोमध्ये हजेरी लावली आहे. (Bigg Boss)

२०११ मध्ये बिग बॉसच्या घरात स्पर्धक बनून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या सनी लियोनीने दरवर्षी शोमध्ये गेस्ट म्हणून हजेरी लावली आहे. गायक अभिषेक सिंहने ह्या रॅपला आवाज दिला असून 'मेरी पार्टी में कोई थर्ड पार्टी नहीं' असे या गाण्याचे बोल आहेत. टी-सीरिजच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर हे गाणं रिलीज केलं आहे. प्रमोशनदरम्यान, ‘थर्ड पार्टी साँग’वर सनी लिओनी, गायक अभिषेक सिंग आणि सलमान खानने ठेका धरला होता. आतापर्यंत या शोमध्ये अनेक सेलिब्रिटींनी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी उपस्थिती लावली होती. (Bollywood News)

यावेळी सलमान खानने सनीचा बिग बॉस स्पर्धक ते बॉलीवूड स्टारपर्यंतचा अनोखा प्रवास सर्वांना पुन्हा एकदा दाखवून दिला आहे. तिच्या कामगिरीचे सलमानने तोंडभरुन कौतुक केले आहे. तिच्या फॅशनची कायमच सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत असते. सनी लियोनीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचेस तर, अनुराग कश्यपच्या ‘केनेडी’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. येत्या वर्षी सनी लियोनीचा ‘कोटेशन गँग’ हा चित्रपट सुद्धा रिलीज होणार आहे. तिच्यासोबत जॅकी श्रॉफ, प्रियामणी आणि सारा अर्जुन दिसणार आहे. या चित्रपटातून सनी लियोनी तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. (Bollywood News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT