Bigg Boss 17 Weekend Ka War Latest News Twitter
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Weekend Ka War: बिग बॉसच्या घरामध्ये सलमान पुन्हा भडकला; ईशा- समर्थची केली कानउघडणी, म्हणाला...

Bigg Boss 17 Latest News: नेहमीप्रमाणेच यंदाचाही ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन बराच वादळी ठरतोय. पहिल्या दिवसापासूनच सुरु असलेला हा वाद सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे. सध्या घरातलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Weekend Ka War Latest News

नेहमीप्रमाणेच यंदाचाही ‘बिग बॉस’चा १७ वा सीझन बराच वादळी ठरतोय. वाद, मैत्री आणि प्रेम असं समीकरण ठरलेल्या बिग बॉसचा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ग्रँड फिनाले रंगणार आहे. पहिल्या दिवसापासूनच सुरु असलेला हा वाद सर्वांच्याच चर्चेचा विषय आहे.

सध्या घरातलं वातावरण चांगलंच तापलेलं दिसत आहे. समर्थ जुरेल, इशा मालवीय यांचा अभिषेक कुमारसोबत झालेला वाद सध्या प्रचंड चर्चेत आहे. समर्थ जुरेलच्या कानशिलात दिल्यानंतर अभिषेक कुमारला शोच्या बाहेर काढण्यात आलं आहे. (Bollywood)

खरंतर, ईशा मालवीय आणि समर्थ जुरैलने मिळून अभिषेक कुमारला प्रमाणाच्या बाहेर पोक केलं. या तिघांमध्ये झालेल्या भांडणात रागाच्या भरात अभिषेकने समर्थच्या थेट कानशिलातच मारली. कानाखाली मारल्यानंतर अभिषेकला बिग बॉसच्या घरातून बाहेर काढले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेकच्या बाबतीत कोणता निर्णय घ्यायचा, हे बिग बॉसने घराची कॅप्टन अंकिताला ठरवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर अंकिता लोखंडेने अभिषेकला घराबाहेर काढलं आहे. येत्या विकेंड का वारमध्ये या प्रकरणाचे पडसाद उमटताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. (Bollywood News)

विकेंड का वारमध्ये या कारणामुळे सलमान सर्वांवर चांगला भडकला होता. यावेळी सलमानने समर्थची चांगलीच कानउघडणी केली. अभिषेकला जबरदस्तीने उसकवल्याप्रकरणी सलमाने समर्थसोबतच ईशा मालवीयलाही चांगलेच सुनावले. यावेळी सलमान म्हणाला, "100 % अभिषेक चुकीचा वागलाय. त्याच्यासोबतच त्याला ती चूक करायला लावणारा व्यक्तीही चुकीचा नाही का ?" असा सवाल त्याने सर्व सदस्यांना विचारला. समर्थचे वागणे पाहून त्याला कोणी समजावलेही नाही. असं म्हणत सलमानने घरातल्या सदस्यांना फटकारलं. (Bigg Boss)

सलमानने ईशा आणि समर्थची चांगलीच कानउघडणी केली आहे. दोघेही वागलेल्या प्रकरामुळे सलमानने त्यांना झापलं आहे. काही दिवसांपूर्वीच ईशा मालवीय, समर्थ जुरैल आणि अभिषेक कुमार यांच्यात मोठा वाद झाला होता. ईशा आणि समर्थ या दोघांनीही अभिषेकला त्याच्या मानसिक आरोग्याच्या समस्यावरून खिल्ली उडवली होती. त्यामुळे अभिषेकने रागाच्या भरात समर्थच्या कानाखाली मारली. त्यामुळे अभिषेकला कॅप्टन अंकिताने घराबाहेर काढलं. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या मनातलं घडतंय? वाढदिवसानिमित्त ठाकरे बंधूंची भेट 'मातोश्री'च्या भेटीमागची इनसाईड स्टोरी

Prakash Ambedkar : जातनिहाय जनगणना रोखणं चूक नव्हे, तर...; प्रकाश आंबेडकरांचा राहुल गांधींवर नेम

SCROLL FOR NEXT