सिद्धार्थ मल्होत्राच्या (Siddharth Malhotra) ‘इंडियन पोलिस फोर्स’ (Indian Police Force) या वेब सीरीजची गेल्या अनेक दिवसांपासून चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना दिसतेय. ज्या दिवसाची गेल्या अनेक दिवसापासून नेटकरी वाट पाहत होते, अखेर तो क्षण आला आहे.
रोहित शेट्टी (Rohit Shetty) दिग्दर्शित ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरीजचा नुकताच ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये दमदार आणि डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटांप्रमाणेच या वेब सीरिजमध्येही प्रेक्षकांना भरपूर ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. यात काही मराठी कलाकारांची देखील झलक पाहायला मिळाली आहे. (Bollywood)
खरंतर, ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेबसीरीजच्या माध्यमातून दिग्दर्शक रोहित शे़ट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, शिल्पा शेट्टी आणि विवेक ओबेरॉय ओटीटी विश्वात डेब्यू करणार आहे. त्याच्यासोबत इतर काही सेलिब्रिटी ओटीटी विश्वात डेब्यू करणार आहे.
या वेबसीरीजमध्ये प्रमुख भूमिकेत अभिनेत्री शिल्पा शेट्टी, अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय तर मराठमोळ्या सेलिब्रिटींमध्ये सुचित्रा बांदेकर, शरद केळकर आणि वैदेही परशुरामी हे सेलिब्रिटी दिसणार आहेत. (Marathi Actress)
बॉलिवूडच्या फेमस दिग्दर्शकांच्या यादीत रोहित शेट्टीचे नाव आवर्जून घेतले जाते. सिम्बा, सिंघम यांसारखे अनेक हिट चित्रपटांचं त्याने दिग्दर्शन केलं आहे. रोहितने रुपेरी पडदा गाजवल्यानंतर आता ओटीटीही गाजवण्यास सज्ज झाला आहे. (OTT)
‘इंडियन पोलिस फोर्स’च्या ट्रेलरमध्ये धमाकेदार ॲक्शन, दमदार अभिनय, ड्रामा, जबरदस्त संवाद आणि सगळं काही पाहायला मिळालं आहे. ३ मिनिट २ सेकंदाच्या या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना स्क्रीनवर खिळवून ठेवण्याची ताकद आहे. हा ट्रेलर दिल्लीच्या संसदेत बॉम्बस्फोटाच्या दृश्याने सुरू होतो. त्यानंतर दिल्ली पोलिसांचं मिशन सुरु होतं. या अफलातून ट्रेलरमध्ये बऱ्याच दमदार डायलॉग्सने चाहत्यांचे लक्ष वेधलेय. तीन पोलिसांची कथा नेटकऱ्यांना फारच भावली आहे. या ट्रेलरला एका दिवसाच्या आतच २ मिलियन्सहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. (Web Series)
दरम्यान, ‘इंडियन पोलीस फोर्स’ ही सीरिज येत्या १९ जानेवारी पासून 'ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सध्या या वेबसीरीजची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे. या वेबसीरीजचे एकूण ७ एपिसोड्स असणार आहेत. (Entertainment News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.