Isha Malviya And Samarth Jurel Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'फॅमिली शो असा असतो का?', कॅमेऱ्यासमोर ईशा आणि समर्थने केले लिपलॉक, व्हिडीओ पाहून नेटिझन्स संतप्त

Isha Malviya And Samarth Jurel Video: ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक कुमार यांचा लव्ह ट्रँगल. सध्या यांच्यामुळे हा शो चांगलाच चर्चेत आहे.

Priya More

Isha Malviya And Samarth Jurel:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच वादग्रस्त रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्य प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन करत आहेत. या शोमधील काही स्पर्धक असे आहेत जे प्रेक्षकांची डोकेदुखी बनत चालेल आहेत.

यामधीच स्पर्धक म्हणजे ईशा मालवीय, समर्थ जुरेल आणि अभिषेक कुमार यांचा लव्ह ट्रँगल. सध्या यांच्यामुळे हा शो चांगलाच चर्चेत आहे. या शोमधील तिघांची गोंधळवून टाकणारी लव्हस्टोरी पाहून प्रेक्षकही आश्चर्यचकित झाले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वीकेंड का वारमध्ये सलमान खानने ईशा मालवीयला हा लव्ह ट्रँगल वापरल्याबद्दल चांगलेच सुनावले. याचदरम्यान सलमानने ईशाचा गेम प्लॅन उघड केला आणि सांगितले की समर्थ आणि अभिषेकने तिच्या मागे भांडावे अशी तिची इच्छा आहे. सलमानने फटकारल्यानंतर आता ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. जो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवरून नेटिझन्स चांगलेच संपातले आहेत.

'बिग बॉस 17' च्या या व्हायरल व्हिडिओमध्ये, ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल रात्रीच्या अंधारात 100 कॅमेरे लावलेल्या बिग बॉसच्या घरामध्ये लिप लॉक करताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ईशा मालवीय आणि समर्थ जुरेल एकाच बेडवर झोपलेले दिसत आहे. दोघेही एकमेकांना किस करताना दिसत आहे. ईशा आणि समर्थचा हा एकच व्हिडीओ नाही असे अनेक व्हिडीओ आहे ज्यामध्ये ते यापूर्वी एकमेकांसोबत रोमान्स करताना दिसले आहेत. पण आता समोर आलेल्या या व्हिडीओवरून या दोघांनी सर्व सीमा ओलांडल्या असल्याचे दिसत आहे. त्यामुळे नेटिझन्स तीव्र प्रतिक्रिया देत आहेत

बिग बॉसचा होस्ट सलमान खान नेहमीच 'बिग बॉस'चे कौटुंबिक शो असे वर्णन करतो. जेव्हा हा शो OTT वर प्रसारित झाला तेव्हा सलमान म्हणाला होता की, हा एक कौटुंबिक शो राहील याची मी पूर्णपणे काळजी घेईल. कोणत्याही स्पर्धकाने मर्यादा ओलांडू नये किंवा गैरवर्तन करू नये असे तो वारंवार सांगतो. पण आता बिग बॉस 17 मध्ये वेगळ्याच गोष्टी पाहायला मिळत आहे. ज्या दिवसापासून हा शो सुरू झाला आहे तेव्हापासून स्पर्धक टास्क खेळताना दिसत नाहीत. हा शो लव्ह शोसारखा झाला आहे. या शोमध्ये नवरा-बायकोची भांडणं, गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडचे रुसवे-फुगवे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता प्रेक्षक चांगलेच रागावले आहेत.

ईशा मालवीय आणि समर्थ जुरेलच्या या किसिंग व्हिडिओवर नेटिझन्सनी संतप्त कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, 'फॅमिली शो असा असतो का?' तर दुसर्‍या यूजरने लिहिले की, 'ईशाइतकी इमेज घरातील इतर कोणत्याही सदस्याने खराब केली नाही.' तर तिसर्‍या युजरने लिहिले, 'बेशरम लोक. जरा मोठे व्हा.' आणखी एका युजरने ईशा आणि समर्थसाठी लिहिले, 'किती निर्लज्ज आहेत?'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT