छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध रियालिटी शो 'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) प्रेक्षकांच्या भेटीला येऊन ९ आठवडे झाले आहेत. पण आतापर्यंत या शोमध्ये एकही टास्क व्यवस्थित खेळला गेला नाही आणि बिग बॉसच्या घराला कॅप्टन मिळाला नाही. त्यामुळे प्रेक्षक या शोवर नाराज होते.
पण या आठवड्यामध्ये बिग बॉसच्या घरामध्ये अतिशय व्यवस्थित कॅप्टन्सी टास्क पार पडला. या टास्कमध्ये दोन मित्र आमने-सामने आले होते. यामधील एक स्पर्धक जिंकत तो बिग बॉस १७ चा पहिला कॅप्टन बनला आहे. चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर त्यांची ही इच्छा पूर्ण झाली असून आता बिग बॉसच्या घराला कॅप्टन मिळाला आहे.
'बिग बॉस'च्या घरात कॅप्टन होणं किती महत्त्वाचं आहे हे सर्वांनाच माहीत आहे. ज्याला कॅप्टन पद मिळते तो आठवडाभर सुरक्षित राहतो. बिग बॉस 17 मध्ये ही शक्ती घरातील सर्वात लोकप्रिय स्पर्धक मुनव्वर फारुकीकडे (munawar faruqui) आली आहे. स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीला 'बिग बॉस 17'चा पहिला कॅप्टन म्हणून बिग बॉसने घोषित केले.
बिग बॉसने मुनावर फारुकीला एक टास्क दिला होता. ज्यामध्ये त्याला घरातील सदस्यांना त्याचा रोस्टिंग शो पाहण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे घेण्यास पटवून द्यावे लागले होते. एक-दोन नाही तर सर्व स्पर्धकांना आपल्या शोमध्ये आणण्यात आणि त्यांचे मनोरंजन करण्यात मुनव्वर फारुकी यशस्वी ठरला. मुनव्वर हा टास्क गुपचूप जिंकला. त्यानंतर बिग बॉसने त्याला घराचा पहिला कॅप्टन बनवले.
मुनव्वर फारुकीने 'बिग बॉस 17' मध्ये चार वेळा 'किंग'चा किताब पटकावला आहे. बिग बॉसच्या या सीझनमध्ये अंकिता लोखंडेचा पती विकी जैन आपल्या धूर्त मनाचा वापर करण्यास कमी पडत नसला तरी मुनव्वरला त्याच्या इच्छेनुसार हाताळणे त्याच्यासाठी थोडे कठीण आहे. मुनव्वर फारुकी कॅप्टन झाल्यानंतर एका यूजरने कमेंट सेक्शनमध्ये लिहिले की, 'आता तो अभिषेक कुमारला कसा हाताळतो हे पाहणे मजेशीर असेल.' दुसऱ्या युजरने लिहिले की, 'मनाराला बाद करून तो कर्णधार झाला आहे. मनारा टॉप 2 मध्ये होती.
दरम्यान, मुनव्वर फारुकी या सीझनचा पहिला कॅप्टन ठरला आहे. जो आता आपल्या मनाप्रमाणे घर चालवताना दिसणार आहे. एवढेच नाही तर पुढील आठवड्यात होणाऱ्या नामांकन प्रक्रियेतूनही बचावला गेला आहे.आता या आठवड्यामध्ये नेमकं काय होतंय. मुनव्वरला कितपत घरातील सदस्यांना हँडल करता येतं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.