Randeep And Lin Dance: रणदीप हुड्डा आणि लिन लॅशरामने रिसेप्शन पार्टीत केला धमाकेदार डान्स, व्हिडीओ होतोय व्हायरल

Randeep And Lin Dance Video: रणदीपने लग्नानंतर ११ डिसेंबरला मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी (Randeep And Lin Reception Party) ठेवली होती. रणदीपच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
Randeep And Lin Dance
Randeep And Lin DanceSaam Tv
Published On

Randeep Hooda And Lin Laishram Wedding:

बॉलिवूडचे न्यूली मॅरिड कपल रणदीप हुड्डा (Randeep hooda) आणि त्याची पत्नी लिन लॅशराम (lin laishram) सध्या चांगलेच चर्चेत आहेत. रणदीप आणि लिन यांनी २९ नोव्हेंबरला मणिपूरमध्ये लग्नगाठ बांधली. मणिपूरच्या इंफाळ शहरात मेईतेई रितीरिवाजांनुसार रणदीप आणि लिनने पारंपारिक पद्धतीने लग्न केले. त्याच्या लग्नाला फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते. त्यानंतर रणदीपने लग्नानंतर ११ डिसेंबरला मुंबईमध्ये रिसेप्शन पार्टी (Randeep And Lin Reception Party) ठेवली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रणदीप हुड्डाच्या रिसेप्शन पार्टीला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. या रिसेप्शन पार्टीचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अशामध्ये या कपलने रिसेप्शन पार्टीमध्ये जबरदस्त डान्स केला. यावेळी सर्वांच्या नजरा या कपलच्या डान्सकडेच होत्या. त्यांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या डान्स व्हिडीओला चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने मंगळवारी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर रणदीपच्या रिसेप्शन पार्टीतील एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये रणदीप हुड्डा आणि लिन लॅशराम लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये डान्स करताना दिसत आहेत. रणदीप डान्स करताना थोडासा लाजताना दिसत आहे. पण लिनने अतिशय मस्त डान्स केला.

Randeep And Lin Dance
Salman Khan: सलमान खानच्या मेकअप आर्टिस्टला दगड आणि रॉडने बेदम मारहाण, नेमकं कारण काय?

रणदीप आणि लिनला एकत्र नाचताना पाहून दोघांचेही चाहते खूपच खूश झाले आहेत. ते या व्हिडीओवर कमेंट्स करत त्यांच्या डान्सचे कौतुक करत आहेत. त्यांच्या एका चाहत्याने लिहिले की, 'क्युट कपल.' दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'कपल ऑफ द इयर.' तिसऱ्या चाहत्याने लिहिले की, 'दोघेही किती क्यूट आहेत.'

लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये रिसेप्शन पार्टीमध्ये लिनने लाल रंगाची चमकदार साडी नेसली होती. जी तिने मॅचिंग दुपट्ट्यासह स्टाईल केली होती. केसाचा बन, डायमंड ज्वेलरी आणि न्यूड मेकअपमध्ये लिन खूपच क्युट दिसत होती. तर रणदीप त्याच्या लेडी लव्हसोबत काळ्या कोट-पँटमध्ये खूपच हँडसम दिसत होता.

Randeep And Lin Dance
'12th Fail' फेम विक्रांत मेस्सी होणार बाबा, शीतल ठाकूरच्या बेबी शॉवर पार्टीचे फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com