छोट्या पडद्यावरील वादग्रस्त ठरलेला ‘बिग बॉस १७’ हा रिॲलिटी शो (Bigg Boss 17) चांगलाच चर्चेत आहे. जस जशे पुढे दिवस सरत आहेत, तसतसे या घरामध्ये प्रेक्षकांना अधिकच वाद दिसत आहे.
सततचे वाद, गॉसिप करत सर्व स्पर्धक चर्चेत राहण्याची एकही संधी सोडत नाहीत. अनेकदा कोण कोणते काम करणार यावरुन सुरु झालेला वाद आपण अनेकदा पाहिला आहे. नुकताच बिग बॉसच्या घरातील एक नवा प्रोमो समोर आला आहे. त्या प्रोमोमध्ये, ‘बिग बॉस’ स्पर्धकांना कामावरुन दम देताना दिसत आहे. (Bollywood)
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
प्रोमो कलर्स टिव्हीच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला असून बिग बॉस घरातल्या सर्व स्पर्धकांना घरातली आधीची दृश्य दाखवत आहेत. आणि नंतर सध्याचे काही फोटो व्हिडीओ दाखवत आहेत. ज्यावेळी ‘बिग बॉस १७’ शो सुरु झाला तेव्हाचे दृश्य व्हिडीओमध्ये दिसत आहे. व्हिडीओ दाखवल्यानंतर बिग बॉसने सर्व स्पर्धेकांना “सर्व कसे वाटले?” असा प्रश्न विचारला. त्यावेळी सर्वच स्पर्धक खूप छान अशी प्रतिक्रिया त्यांना दिली. (Bigg Boss)
त्यानंतर बिग बॉसने सर्व स्पर्धकांना घराची सध्याची परिस्थिती दाखवली. त्या व्हिडीओमध्ये स्पर्धकांनी घरामध्ये घातलेला पसारा, किचनमध्ये जेवण बनवल्यानंतरचा पसारा, किचनमधला कचरा, घरामध्ये अस्थाव्यस्थ ठेवलेल्या वस्तू, विचित्र पद्धतीने ठेवलेले कपडे त्या व्हिडीओमध्ये बघायला मिळत आहे. घरातली सध्याची परिस्थिती दाखवल्यानंतर बिग बॉसने काही तासांचा अवधी देत सर्व केलेला पसारा आवरायला सांगतात. (Viral Video)
सोबतच यावेळी बिग बॉसने घरातला पसारा पाहून सर्व सदस्यांच्या आरोग्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. बिग बॉसने सर्व स्पर्धकांना एक तासाचा वेळ दिलेला असतो. तितक्या वेळेत त्यांना घराची साफसफाई करायची आहे. नाहीतर मला साफसफाई करायला उतरावं लागेल. जर मी साफसफाई करायला लागलो तर घरातील स्पर्धकांची गर्दी कमी होईल. ‘बिग बॉस’च्या या अल्टिमेटमनंतर घरातील सर्वच स्पर्धक साफसफाई करताना दिसत आहेत. (Bollywood News)
‘बिग बॉस १७’ सुरु होऊन महिना झाला आहे. सध्या बिग बॉसच्या घरामध्ये वाईल्ड कार्ड स्पर्धकांची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरामध्ये, बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत, तिचा एक्स पती आदिल खानसोबत बिग बॉसच्या घरात एन्ट्री करणार आहे. तिच्यासोबत बिग बॉसच्या घरात भाविन भानुशाली आणि पूनम पांडे हे दोन वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री करण्याची शक्यता आहे. (Entertainement News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.