Soniya Bansal Allegations on Munawar Faruqui Soniya Bansal Allegations
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: 'त्याने माझा हात पकडला आणि...', बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच सोनिया बंसलने मुनव्वर फारुकीवर केला गंभीर आरोप

Soniya Bansal News: सोनियाने माध्यमांशी संवाद साधला यावेळी तिने स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीयावर (munawar faruqui) गंभीर आरोप केला आहे.

Priya More

Soniya Bansal On Munawar Faruqui :

'बिग बॉस १७' (Bigg Boss 17) हा रियालिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील सर्व स्पर्धक प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये यावेळी १७ स्पर्धकांनी एन्ट्री घेतली होती. पहिल्या दिवसापासून या स्पर्धकांमध्ये भांडण सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

नुकताच बिग बॉसच्या घरातून सोनिया बंसल (soniya bansal) ही बाहेर पडली. सोनाली ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणारी पहिली स्पर्धक ठरली. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच सोनियाने माध्यमांशी संवाद साधला यावेळी तिने स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकीयावर (munawar faruqui) गंभीर आरोप केला आहे.

बिग बॉसच्या घरात मुनव्वर फारुकीने तिचा हात धरला होता, असे सोनिया बंसलने सांगितले आहे. याशिवाय सोनिया बंसलने बिग बॉसच्या घरामध्ये आलेल्या अनुभवाबद्दल अनेक गंभीर खुलासे केले आहेत. सोनिया बंसलने टाईम्स नाऊ या न्यूज चॅनेलशी संवाद साधताना सांगितले की,'बिग बॉस 17 च्या घरात मुनव्वर फारुकीने माझा हात धरला होता.'

तसंच, 'बिग बॉसच्या घरात माझी मुनव्वर फारुकीशी खूप छान चर्चा झाली. मी त्याचे कधीच ऐकले नाही. म्हणूनच तो माझ्याशी बोललाही नाही. मी त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखत असे. एकदा एक प्रकरण समजावून सांगताना त्याने माझा हात धरला. तेव्हाच मी त्याला सांगितलं की दूर उभं राहून बोल, हात पकडण्याची गरज नाही. माझी अपेक्षा होती की त्याने दूर राहावे. '

मुनावर फारुकीवर गंभीर आरोप करण्यासोबतच सोनिया बंसलने 'बिग बॉस 17'च्या घरातील अनेक गोष्टींबद्दल माहिती दिली. सोनिया बन्सलने विकी जैनला घरातील मास्टरमाइंड म्हटले आणि शोमधून बाहेर काढण्यासाठी तो जबाबदार असल्याचेही सांगितले. मनारा चोप्रा आणि मुनव्वर फारुकी यांच्यातील मैत्री खोटी असल्याचे देखील सोनिया बंसलने सांगितले आहे. अंकिता लोखंडेने 'बिग बॉस 17'चे विजेतेपद जिंकावे अशी सोनिया बन्सलने इच्छा व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

Ambarnath Crime : अंबरनाथमधील हल्ला प्रकरणात धक्कादायक खुलासा; सहा तरुणांविरोधात गुन्हा दाखल

Politics : 'ED-CBIची चौकशी थांबवा; आम्ही भाजपमध्ये येतो...' बड्या खासदाराचा खळबळजनक दावा

Crime: 'एका रात्रीत तीन वेळा...', घरी बोलावून घेतलं, खासदाराकडून २ तरुणांवर बलात्कार

Cyber Crime: बॅंकिग फ्रॉड टाळण्यासाठी 'या' टिप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT