Ayesha Khan Big Claim On Munawar Faruqui Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: एकाच वेळी दोन मुलींना..., आयशा खानचा मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप

Ayesha Khan Big Claim On Munawar Faruqui: बिग बॉसच्या घरात आपल्या गेम स्टॅटेजीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

Priya More

Bigg Boss 17 Contestant Munawar Faruqui:

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध आणि तितकाच रियालिटी शो 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) सध्या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. हा शो दिवसेंदिवस आणखी इंटरेस्टिंग होत चालला आहे. बिग बॉसच्या घरातील प्रत्येक स्पर्धक काही ना काही कारणास्तव चर्चेत असतो. बिग बॉसच्या घरात आपल्या गेम स्टॅटेजीने प्रेक्षकांची मनं जिंकणारा मुनव्वर फारुकी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.

मुनव्वर फारुकीच्या (Munawar Faruqui) लव्ह लाईफबद्दल घराबाहेर बऱ्याच काही चर्चा सुरू आहेत. नुकताच अभिनेत्री आयशा खानने (Ayesha Khan) एका पॉडकास्टदरम्यान मुनव्वर फारुकीवर गंभीर आरोप केले.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मुनव्वर फारुकीचे नाव न घेता आयशाने सांगितले की, 'बिग बॉस शोच्या एका सदस्याला ती ओळखते ज्याने मला संपर्क केला होता. आधी संभाषण फक्त हाय हॅलोने सुरू झाले होते. कारण त्याला माझ्यासोबत व्हिडीओ बनवायचा होता. पण तो व्हिडीओ तर काही तयार झाला नाही पण आमचं बोलणं सुरूच होते.

त्याने मला प्रपोज केला होता.' आयशा खानने पुढे सांगितले की, 'मी देखील त्याला पसंत करू लागली होती. तो एका रिलेशनशिपमध्ये आहे हे मला माहिती होते. पण त्याने सांगितले होते की माझा ब्रेकअप झाला आहे.'

अभिनेत्रीने पुढे सांगितले की, 'त्याने मला वचन दिले होते की आमच्या रिलेशनशीपवर काहीही परिणाम होणार नाही. त्याने मला सांगितले होते की तो बिग बॉसमध्ये जाणार आहे. त्या दिवशी त्याने या शोमध्ये एन्ट्री केली. मी या स्पर्धकाचे त्याच्या गर्लफ्रेंडसोबतचा फोटो त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पाहिला होता. त्यानंतर मला समजले की, तो अजूनही माझ्यासोबत आणखी एका मुलीला डेट करत आहे.'

आयशा खानच्या या मुलाखतीनंतर मनोरंजन विश्व हादरले असून आता यावर चर्चा सुरू आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर लोकांचा अंदाज आहे की ती मुनव्वर फारुकीबद्दल बोलत आहे. दरम्यान, याआधीही मुनव्वर फारुकीची एक रील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या व्हिडिओमध्ये डान्स करताना नाझिला सिताशी म्हणाली होती, 'माझ्या बॉयफ्रेंडला दोन गर्लफ्रेंड आहेत.' याशिवाय नाझिला सिताशीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली होती. ज्यामध्ये तिने मुनव्वरचे खरे आयुष्य आणि ऑनलाइन पाहिलेले आयुष्य यातील फरक स्पष्ट केला. नझिला सिताशीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यातील पाचही मानाच्या गणपतीचे विसर्जन

राफेल विमान प्रतिकृतीतून लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी; गणेश विसर्जन सोहळ्यात भक्तांचा उत्साह शिगेला|VIDEO

Chandragrahan 2025: चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी काय करावे आणि काय टाळावे?

Aadhaar Verification : आधार कार्ड खरे की खोटे? फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी आवश्यक टिप्स

Pune Ganpati Visarjan: पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे भव्य विसर्जन संपन्न|VIDEO

SCROLL FOR NEXT