Bigg Boss 17 Contestant List Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17 Contestant List: ‘बिग बॉस १७’च्या घरात होणार नवीन स्पर्धकांची एन्ट्री; नावेही आली समोर, वाचा संपूर्ण यादी

Bigg Boss 17 Latest Update: ‘बिग बॉस १७’च्या घरात कोणकोणते कलाकार स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी होणार याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांसमोर स्पर्धकांची यादी आली आहे.

Chetan Bodke

Bigg Boss 17 Contestant List

येत्या १७ ऑक्टोबरपासून ‘बिग बॉस १७’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कायमच वादाच्या भोवऱ्यात राहणाऱ्या शोची गेल्या अनेक दिवसापासून सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे. कोण कोणते कलाकार स्पर्धक म्हणून या शोमध्ये सहभागी होणार याची प्रत्येकालाच उत्सुकता होती. अखेर प्रेक्षकांसमोर स्पर्धकांची यादी आली आहे.

यंदाचं ‘बिग बॉस १७’ स्पर्धकांसह प्रेक्षकांसाठी खास असणार आहे. यंदाची थीम सिंगल विरुद्ध कपल अशी असणार असून यांच्यातील वाद आपल्याला पाहायला मिळणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला ‘बिग बॉस ओटीटी २’ आलं होतं. या सीझनमध्ये आपल्याला अनेक प्रसिद्ध युट्यूबर दिसले होते. त्याच प्रमाणे यंदाच्या ‘बिग बॉस १७’ मध्ये ही युट्यूबर दिसणार आहेत.

युट्यूबर अरमान मलिकची पत्नी पायल मलिक सुद्धा ‘बिग बॉस १७’मध्ये दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याने दोन लग्न केले असून त्याच्या दोन्हीही पत्नी कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. पहिल्या पत्नीचे नाव पायल मलिक तर दुसऱ्या पत्नीचे नाव कृतिका मलिक आहे.

त्यासोबतच ‘बिग बॉस १७’मध्ये ‘बिग बॉस ओटीटी २’चा विजेता एल्विश यादवची एक्स गर्लफ्रेंड सुद्धा येणार आहे. दरम्यान युट्यूबरने ‘बिग बॉस ओटीटी २’मध्ये त्याच्या आणि किर्तीच्या मैत्रीचाही उल्लेख केला होता.

सोबतच यावेळी प्रेक्षकांना बरेच युट्यूबर्स पुन्हा एकदा एका मंचावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. त्यांचे सोशल मीडियावर फॅन्स लिस्ट सुद्धा प्रचंड मोठी असून ‘बिग बॉस १७’ ला टीआरपीसाठी खूप मोठा फायदा होऊ शकतो. अरमान, कृतिका किंवा पायल मलिक, कंवर ढिल्लो, एल्विशची एक्स गर्लफ्रेंड किर्ती मेहरा, फैज बलूच, जय सोनी, संदीप सिकंद यांच्या नावाची सध्या चर्चा होत असून काही नावांवर शिक्कामोर्तब झालेला आहे.

‘बिग बॉस १७’मध्ये स्पर्धेक म्हणून अंकिता लोखंडे आणि विक्की जैन, ऐश्वर्या शर्मा आणि नील भट्ट, इशा मालवीय आणि अभिषेक कुमार, मुनव्वर फारूकी, अनुराग डोभाल उर्फ ​​यूके राइडर, मन्नारा चोपड़ा, जिग्ना वोरा, सनी आर्य उर्फ ​​तहलका प्रैंक, मनस्वी ममगई, ऋषि धवन यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान बिग बॉसमध्ये येण्यासाठी अंकिता लोखंडे, तिचा पती विक्की जैन, अरमान मलिकची पहिली पत्नी पायल मलिक यांनी चांगलीच तयारी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

SCROLL FOR NEXT