Ankita Lokhande Emotional Video Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 17: सुशांतच्या शेवटच्या आठवणीत पुन्हा इमोशनल झाली अंकिता लोखंडे, म्हणाली - 'त्याला तसं पाहून माझे हात पाय थंड पडले'

Ankita Lokhande On Sushant Singh Rajput: बिग बॉसच्या घरामध्ये अनेकदा अंकिताला तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना आपण पाहिले आहे. ती बऱ्याचदा तिचा एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या (Sushant Singh Rajput) आठवणी सांगताना आपण पाहिले आहे.

Priya More

Ankita Lokhande Emotional Video:

'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) घरातील सदस्या अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) सध्या चांगलीच चर्चेत असते. अंकिता ही बिग बॉसच्या घरातील प्रेक्षकांची आवडती स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरामध्ये अनेकदा अंकिताला तिच्या भूतकाळाबद्दल बोलताना आपण पाहिले आहे. ती बऱ्याचदा तिचा एक्स बॉयफ्रेंड म्हणजेच दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या (Sushant Singh Rajput) आठवणी सांगताना आपण पाहिले आहे.

यावेळी ती बऱ्याचदा इमोशनल होऊ रडलेले देखील आपण पाहिले आहेत. आता अंकिता लोखंडे पुन्हा एकदा सुशांतच्या आठवणीमध्ये इमोशनल झाले आहे. नुकताच समोर आलेल्या एपिसोडमध्ये मुनव्वरसोबत गप्पा मारताना अंकिता सुशांतच्या शेवटच्या आठवणीबद्दल सांगताना दिसत आहे. सध्या तिचा या एपिसोडमधील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंह राजपुत सात वर्षे रिलेशनशीपमध्ये. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिताचे मन खूप तुटले होते. याबद्दल ती अनेकदा बिग बॉसच्या घरामध्ये बोलली आहे. आता अंकिताने सुशांतचा शेवटचा फोटो पाहिल्यानंतर नेमकं काय झालं ते सांगितले. मुनावर फारुकीशी गप्पा मारताना अंकिता लोखंडेने सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. इतकंच नाही तर सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे हृदय पिळवटून टाकणारे फोटो पाहून तिचे काय रिअॅक्शन होते हे देखील तिने सांगितले.

अंकिताने मुनव्वरला सांगितले की, 'जेव्हा मी त्याला पाहिले तेव्हा मला वाटले की सर्व काही संपले आहे. त्याने बरेच चित्रपट केले आणि ते सर्व काही संपले. त्याचा एक फोटो होता जो खूप वाईट होता. तो फोटो पाहून माझे हात पाय थंड पडत होते. तो झोपला आहे असे वाटत होते. मी नुसतं तो फोटो बघत राहिले आणि विचार करत राहिले की त्याच्या मनात किती काय काय होते.' अंकिताने पुढे सांगितले की, 'मी त्याला खूप चांगले ओळखत होते. त्याच्या मनात खूप काही राहिलं असेल. पण ते सगळं नाहीसं झालं. ते काहीच नाही, फक्त एक शरीर होते.' मुनव्वरने अंकिताला सुशांतच्या कुटुंबाबद्दल विचारले असता त्याबद्दल देखील अंकिताने सांगितले. यावेळ तिने सुशांतचे आणि त्याच्या कुटुंबाचे खूप कौतुक केले.

मुनव्वरने विचारले, 'त्याचे कुटुंब बिहारमध्ये होते का?' तर अंकिताने सांगितले की, 'नाही. त्यांची एक बहीण अमेरिकेत होती, दुसरी चंदिगडमध्ये होती आणि वडील पाटणा आणि दिल्लीत राहत होते. अतिशय सुशिक्षित कुटुंब आहे. ते उच्चशिक्षित लोकं आहेत.' अंकिताने पुढे सुशांत सिंह राजपूतबद्दल सांगितले की, 'त्याचे बुद्धी खूप तल्लख होती. तो एका झटक्यात गणिते सोडवत असे. तो आयआयटीचा विद्यार्थी होता आणि त्याने भारतातील आयआयटीमध्ये 7 वा क्रमांक मिळवला होता.', असे म्हणत अंकिताने सुशांतचे कौतुक देखील केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT