Ankita Lokhande Cried Saam Tv
मनोरंजन बातम्या

Ankita Lokhande Cried Video: 'बिग बॉस'च्या घरात जाताच अंकिता आणि विकीच्या नात्यात दुरावा, असं काय झालं की अभिनेत्री ढसाढसा रडली?

Bigg Boss 17: अंकिता आणि विकीमध्ये सतत काहीना काही कारणांवरून वाद होत आहे. अशातच अंकिता ढसाढसा रडल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Priya More

Ankita Lokhande Cried Bitterly:

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) आणि तिचा पती बिझनेसमन विकी जैन (Vicky Jain) या कपलने नुकताच बिग बॉसच्या घरामध्ये एन्ट्री घेतली. बिग बॉसच्या घरामध्ये जाण्यापूर्वी हे कपल खूपच आनंदी होते. दोघांनीही बिग बॉसच्या घरामध्ये रोमँटिंक अंदाजमध्ये एन्ट्री घेतली खरी.

पण आता बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर अंकिता आणि विकीच्या नात्यामध्ये दुरावा आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दोघांमध्ये सतत काहीना काही कारणांवरून वाद होत आहे. अशातच अंकिता लोखंडे ढसाढसा रडल्याचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे.

बिग बॉसच्या घरामध्ये अंकिता आणि विकी जबरदस्त अंदाजमध्ये एन्ट्री केली. पण अवघ्या तीन दिवसांतच या जोडप्याच्या नात्यात दुरावा आला आहे. बिग बॉसचा घरातील प्रवास सुरू होताच या कपलचे नाते पणाला लागले आहे. बिग बॉसच्या घरात आल्यानंतर दोघांमध्ये खटके उडताना दिसत आहे. याचा पुरावा म्हणजे नुकताच समोर आलेला 'बिग बॉस 17'चा प्रोमो. ज्यामध्ये अंकिता विकीला तिच्या एकटेपणाबद्दल सांगत ढसाढसा रडताना दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'बिग बॉस 17' च्या समोर आलेल्या प्रोमोमध्ये अंकिता बेडरूममधील तिच्या बेडवर झोपलेली दिसत आहे. ती विकीवर प्रचंड रागावली असल्याचे दिसत आहे. अशामध्ये विकी तिच्या जवळ येतो आणि विचारपूस करतो. त्याचवेळी अंकिता 'तू आमचं नातं खूप कॅज्युअल घेत आहेस.'असं विकीला म्हणते. अंकिताच्या या सर्व गोष्टी ऐकून विकी चकीत होतो.

यानंतर अंकिता भावुक होते आणि विकीला म्हणते - 'मी बिग बॉसमध्ये आले कारण आम्ही दोघे एकत्र राहू आणि एकमेकांना सपोर्ट करू. पण आम्ही दोघे कुठेच नाही. संपूर्ण जग मला दुखवू शकत नाही, फक्त माझी व्यक्तीच मला दुखवू शकते आणि मला खूर दुख: होत आहे. मला एकटं वाटतंय.' असं म्हणत अंकिताचे डोळे भरून येतात आणि ती रडू लागते. यानंतर विकी अंकिताला सॉरी म्हणतो.

सध्या 'बिग बॉस 'चा हा सीझन खूपच रंगतदार होत चालला आहे. बिग बॉसच्या घरामध्ये येताच स्पर्धकांमध्ये भांडण व्हायला सुरूवात झाली. तर दुसरीकडे काही स्पर्धकांमध्ये प्रेमाची कळी फुलायला सुरूवात झाली आहे. पहिल्या आठवड्यात तीन स्पर्धक नॉमिनेट झाले आहेत. घरातील सर्व स्पर्धकांनी मनारा चोप्रा, अभिषेक कुमार आणि नावेद सोले यांना नॉमिनेट केले आहे. आता बिग बॉसचा प्रवास सुरू होताच कोणता खेळाडू घराबाहेर जाईल हे लवकरच कळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: देवेंद्र फडणवीसांना दिलासा; निवडणुकीसदंर्भातील याचिका कोर्टाने फेटाळली

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना ट्विट करत धमकी देणारे सुशील केडिया कोण आहेत?

उपवासात मिळवा चव आणि पोषण यांचा मेळ; बनवा ही खास इडली

Dharashiv : आदिवासी समाजावर ग्रामपंचायतीचा सामाजिक बहिष्कार; सरपंच व ग्रामसेवकावर कारवाईची मागणी

MNS Warns Sushil Kedia : ५ तारखेनंतर काय करायचं ते करू; राज ठाकरेंना धमकी देणाऱ्या केडियांना मनसेचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT