Burt Young Death: हॉलिवूडवर शोककळा! 'रॉकी' फेम अभिनेत्याचं निधन

Burt Young Passes Away: हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.
Burt Young Death
Burt Young DeathSaam tv
Published On

Hollywood News:

हॉलिवूडमधून (Hollywood) एक अत्यंत दु:खद बातमी समोर आली आहे. सुप्रसिद्ध अमेरिकन अभिनेता आणि लेखक बर्ट यंग यांचे निधन झाले आहे. बर्ट यंग यांनी वयाच्या ८३ व्या वर्षी अखेरचा श्वास (Burt Young Death) घेतला. हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दमदार भूमिका साकारल्या आहेत.

बर्ट यंग यांच्या निधनामुळे हॉलिवूडवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. सिल्वेस्टर स्टॅलोन यांच्या चित्रपटाच्या ६ पार्ट्मध्ये 'पॉली' ची भूमिका साकारण्यासाठी बर्ट यंग प्रसिद्ध होते. या चित्रपटातील त्यांची ही भूमिका खूपच गाजली.

बर्ट यंग यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली. बर्ट यंग यांनी लॉस एंजेलिसमध्ये अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्याच्या निधनाचे वृत्त समोर आल्यानंतर त्याचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. बर्ट यंग यांची मुलगी अ‍ॅन मोरिया स्टींगीसर हिने न्यूयॉर्क टाइम्सशी बोलताना तिच्या वडिलांच्या मृत्यूच्या बातमीची पुष्टी केली. हॉलिवूड अभिनेत्याच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही.

रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्क क्वीन्समध्ये जन्मलेल्या बर्ट यंगने चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी 1957 ते 1959 या काळात यूएसएच्या 'मरीना कॉर्प्स'मध्ये काम केले होते. यानंतर त्यांनी बॉक्सिंगमध्येही हात आजमावला, ज्यामध्ये त्याने एकूण 34 सामने खेळले, त्यापैकी 32 सामने त्यांनी जिंकले. त्यांनी बहुतेक इटालियन-अमेरिकन पात्रे साकारली. ज्यामध्ये 'मॉब बॉस', 'अ स्ट्रीट स्मार्ट डिटेक्टिव' आणि 'अ वर्किंग क्लास मॅन' माणूस यांचा समावेश आहे.

Burt Young Death
Scam 2003 Part 2 Trailer: 'मुंबई का किंग कौन?', 'स्कॅम 2003 पार्ट 2' चा ट्विस्टनं भरलेला ट्रेलर आऊट; तेलगी घोटाळा डोळ्यांसमोर येणार

30 एप्रिल 1940 रोजी न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या बर्ट यंगने आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट तसेच मालिकांमध्ये काम केले आहे. 1976 मध्ये आलेल्या 'रॉकी' चित्रपटातील रॉकी बाल्बोआचा मित्र आणि मेहुणा 'पॉली हे पात्र त्यांनी साकारले होते. यामुळे त्यांना खूपच चांगली ओळख मिळाली. पॉली हे त्यांच्या सर्वात जास्त लोकप्रिय पात्रांपैकी एक आहे.

Burt Young Death
Akshay Kumar Tiger Shroff: दीपिकानंतर 'सिंघम अगेन'मध्ये टायगर श्रॉफची एन्ट्री; अक्षय कुमारने केलं शिक्कामोर्तब

बर्ट यंग यांनी 1969 मध्ये 'द डॉक्टर्स' या मालिकेद्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ज्यामध्ये त्यांनी बारटेंडरची भूमिका केली होती. यानंतर त्यांनी 1970 मध्ये चित्रपटांमध्ये काम करायला सुरूवात केली. 'कार्निवल ऑफ ब्लड' हा त्याचा पहिला चित्रपट होता. ज्यामध्ये त्याने 'जिम्पी'ची भूमिका साकारली होती.

यानंतर त्यांनी 'बॉर्न टू विन', 'अक्रॉस 110th स्ट्रीट', 'चायना टाउन', 'सिंड्रेला लिबर्टी' यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रॉकी' चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्यासाठी ऑस्कर पुरस्कारांमध्ये गौरवण्यात आलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Burt Young Death
Ankita Lokhande Cried Video: 'बिग बॉस'च्या घरात जाताच अंकिता आणि विकीच्या नात्यात दुरावा, असं काय झालं की अभिनेत्री ढसाढसा रडली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com