Abdu Rozik Shares Engagement Pictures Saam Tv
मनोरंजन बातम्या

Abdu Rozik Engagement : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!; फोटो शेअर करत दाखवली बायकोची झलक

Abdu Rozik News : अब्दूने ९ मे रोजी लग्नाची तारीख सांगितली होती, आता त्यानंतर अब्दूने एंगेजमेंटचे फोटो शेअर केलेले आहेत. साखरपुड्याचे फोटो शेअर करत अब्दूने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

Chetan Bodke

गायक अब्दू रोझिकच्या प्रसिद्धीत ‘बिग बॉस १६’ पासून मोठी वाढ झाली आहे. अब्दू रोझिक सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. अब्दूने ९ मे रोजी लग्नाची तारीख सांगितली होती, आता त्यानंतर अब्दूने एंगेजमेंटचे फोटो शेअर केलेले आहेत. साखरपुड्याचे फोटो शेअर करत अब्दूने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. फोटोमध्ये अब्दु आपल्या होणाऱ्या पत्नीला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहे. सध्या अब्दूचे आणि त्याच्या होणाऱ्या पत्नीचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

पण त्याने एंगेजमेंट काल केलेली नसून २४ एप्रिलला केल्याचे सांगितले आहे. फोटो शेअर करताना त्याने "Allhamdulillah 24.04.2024" असं कॅप्शन दिलेले आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये अब्दु एका मुलीला अंगठी घालताना दिसत आहे. पण त्याने चेहरा दाखवलेला नाही. अब्दु आणि अमीराचा साखरपुडा शारजामध्ये पार पडला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये अब्दू आणि त्याची होणारी बायको दोघेही पारंपारिक ड्रेसमध्ये दिसून येत आहे. अब्दुच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

अनेक सेलिब्रिटींनी अब्दूवर अभिनंदनाचा वर्षाव केला असून लाईक्सचा वर्षाव केला आहे. सध्या अब्दू रोझिकच्या एंगेजमेंटचे फोटो तुफान व्हायरल होत असून ४ लाख ९५ हजारांहून अधिक चाहत्यांनी फोटोंवर लाईक्स केले आहेत. अब्दु रोझिकने ९ मे रोजी व्हिडीओ शेअर करत, त्याने लग्न ठरल्याचे सांगितले होते. यावेळी त्याने लग्नाची तारीखही सांगितली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अब्दु रोझिक आणि अमीरा लग्नगाठ बांधणार आहे. अब्दुचा चाहतावर्ग दुबई, भारतासह जगभरामध्ये आहे. अब्दुच्या लग्नासाठी चाहते कमालीचे उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे भीषण कार अपघातात निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Tumor warning signs: शरीरात ही ७ लक्षणं दिसली तर समजा कॅन्सरचा ट्यूमर होतोय तयार

Maharashtra News Live Update: नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरण, ४ दिवसात दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले जाणार

महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! जुलैपासून लागू होणार 'लँड टायटलिंग ॲक्ट'; आता प्रत्येक फ्लॅटचे मिळणार 'मालमत्ता कार्ड'

Ladki Bahin Yojana: मे महिन्याची १० तारीख उजाडली! लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० की ४५०० रुपये येणार? पाहा सविस्तर अपडेट

SCROLL FOR NEXT