Chrisann Pereira News: ...न केलेल्या गुन्ह्यात 26 दिवस यूएई जेलमध्ये राहिली 'सडक 2'ची अभिनेत्री, क्रिसनने सांगितला थरारक अनुभव...

Who is Chrisann Pereira : ...न केलेल्या गुन्ह्यात 26 दिवस यूएई जेलमध्ये राहिली 'सडक 2'ची अभिनेत्री, क्रिसनने सांगितला थरारक अनुभव...
Chrisann Pereira News
Chrisann Pereira NewsSaam Tv

>> सचिन गाड

Chrisann Pereira News: खोट्या ड्रग्स केसमध्ये शारजा येथील कारागृहात असलेली अभिनेत्री क्रिसन परेरा तब्बल चार महिन्यांनी मायदेशी परतली आहे. अभिनेत्री असल्याने चित्रपटांची स्क्रिप्ट क्रिसनला नवी नाहीत.

मात्र एखाद्या चित्रपटाच स्क्रिप्ट आपल्याला प्रत्यक्ष आयुष्यात जगाव लागेल असा तिने कधी स्वप्नात देखील विचार केला नव्हता, काय आहे हे बनावट ड्रग्सच प्रकरण आणि एका भटक्या कुत्र्या वरून झालेल भांडण या टोकाला जातं हे मात्र नक्कीच धक्कादायक आहे.

Chrisann Pereira News
Delhi Services Bill: नेहरू, पटेल आणि आंबेडकरांनी दिल्लीला पूर्ण राज्य करण्यास विरोध केला होता: अमित शाह

सडक २ आणि बाटला हाऊस या चित्रपटात भूमिका करणारी क्रिसन परेरा मोडेलिंसाठी शारजा विमानतळावर दाखल होताच तीच्यकडे ड्रग्स सापडलं आणि तिचं आयुष्यच बदलून गेलं. त्यानंतर पुढचा एक महिना कारावासात आणि उर्वरित तीन महिने केस मधून निर्दोष सुटून मायदेशी परतण्याची वाट बघण्यात निघून गेले. या संपूर्ण प्रकरणात क्रिसनची काही चूक होती ना तिला या सगळ्याची कल्पना, मात्र तरी देखील तिला या सगळ्यातून जावं लागलं. (Latest Marathi News)

ज्यावेळी क्रिसनला समजल की ड्रग्स बाळगल्या प्रकरणी २५ वर्षांच्या शिक्षेची शारजात म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीत तरतूद आहेत. तेव्हा मात्र ती आणि तिचे घरचेच सगळेच घाबरले. त्यांनी थेट मुंबई पोलिसांकडे मदत मागितली. मुंबई गुन्हे शाखेने तपसाची सूत्रे फिरवली आणि जे काही समोर आलं त्याने सगळ्यांना धक्काच बसला.

कधी काळी एका भटक्या कुत्री वरून मुख्य आरोपी अँथोनी पॉल आणि क्रिसनची आई यांच्यात वाद झाला होता. ज्याचा राग अँथनीच्या अंतर्मनात धुमसत होता आणि त्याने अखेर डाव टाकला. क्रिसनच्या कुटुंबियांकडून मदतीच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची खंडणी वसूल करण्याचा देखील त्याचा डाव होता.

Chrisann Pereira News
Thane News: एवढं कुठं मारतात का? NCC च्या विद्यार्थ्यांना भरपावसात काठीने फोडून काढलं; जोशी बेडेकर कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

आपल्या विरोधात एवढा मोठा कट रचला जातोय याची काडीची ही कल्पना नसलेली क्रिसनकडे ड्रग्स सापडल्या नंतर जेल जाण्यापासून कोणी वाचवू शकत नव्हते. किती म्हटलं तरी जेल हे जेलच असते मग ती भारतातली असो की अन्य कोणत्या देशातली. जवळपास महिन्याभराच्या कारावासात वॉशिंग पावडरने केस धुण्याचं, तसेच टॉयलेटच्या पाण्याने बनवलेली कॉफी पिण्याची वेळ क्रिसनवर होती. पोलिसांनी परिस्थितीच गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल केला आणि वेगाने तपास करत आरोपींच्या मुसक्या आवळल्या

क्रिसन ही एकटीच नाही तर अशा एकूण पाच जणांना अँथनीने लक्ष केलं, ज्यातील तिघे सुदैवाने जाळ्यात अडकले नाही. मात्र मुंबईतील एक डीजे (DJ) क्लेटन रॉड्रिग्ज मात्र त्याच्या जाळ्यात अडकला आणि अजूनही शारजा येथील कारागृहात आह., आत्ता त्याला सोडवण्यासाठी गुन्हे शाखा प्रयत्न करतेय.

क्रिसनने सांगितला थरारक अनुभव, पाहा व्हिडीओ...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com