Abdu Rozik Debu Serial: बिग बॉस फेम अब्दू रोझिक टेलिव्हिजन गाजवणार; मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण

Abdu Rozik Serial: लवकरच अब्दू एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे.
Abdu Rozik TV Debut
Abdu Rozik TV DebutSaam Tv

Abdu Rozik TV Debut: ‘मुर्ती लहान पण किर्ती महान’ ही म्हण तुम्ही कदाचित ऐकली असेल. ही म्हण ‘बिग बॉस १६’ फेम अब्दू रोझिकला लागू होतेय. रॅपर म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवलेल्या अब्दूच्या चाहत्यांमध्ये ‘बिग बॉस १६’मुळे चांगलीच वाढ झाली. ‘बिग बॉस १६’नंतर प्रसिद्धीझोतात आलेल्या अब्दूची अनेकदा सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार अशी चर्चा सुरू होती. पण तसं काय झालं नाही. पण आता अखेर त्याने टेलिव्हिजनसृष्टीत पाऊल ठेवले आहे. लवकरच अब्दू एका मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा आहे.

Abdu Rozik TV Debut
Upcoming Marathi Movie : सिद्धार्थ जाधव - जॉनी लिव्हरसह दमदार कास्ट असलेला ‘अफलातून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

ताजिकिस्तानी रॅपर अब्दू रोजिक लवकरच ‘प्यार का पहला नाम: राधा मोहन’ या मालिकेमध्ये एंट्री करणार आहे. मालिकेत मुख्य भूमिकेत शब्बीर अहलुवालिया आणि निहारिका रॉय हे दोन कलाकार झळकणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालिकेच्या आगामी ट्रॅकमध्ये मोहन आणि तुलसी यांची मुलगी गुनगुन हिचा (रीझा चौधरी) वाढदिवस साजरा करताना त्याची एन्ट्री होणार आहे.

विश्वसनीय सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “दामिनी (संभव मोहंटी) अब्दूला गुनगुनचं अपहरण करण्यासाठी पाठवते. अब्दूच्या पात्राचा गुनगुनला इजा करण्याचा हेतू नव्हता, परंतु पैशासाठी दामिनीने दिलेल्या माहितीचे पालन करत असल्याचे नंतर उघड झाले. रीझा आणि अब्दू चांगले मित्र बनतात आणि नंतर तिला दामिनीपासून वाचवतात. अब्दू उद्यापासून या कॅमिओ ट्रॅकच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे.” नुकताच अब्दू त्याचा जवळचा मित्र आणि ‘बिग बॉस १६’ मधील त्याचा मित्र शिव ठाकरे याला पाठिंबा देण्यासाठी केपटाऊनला पोहोचले होता.

Abdu Rozik TV Debut
Project K Actors Fee : प्रभास - दीपिकासह 'प्रोजेक्ट के'च्या कलाकारांनी किती घेतले मानधन ?

सोबतच गेल्या महिन्यात अब्दूने मुंबईत त्याचे रेस्टॉरंटही उघडले आहे. सोशल मीडियावर त्याने उद्घाटन केले आहे, याचा एक व्हिडिओ देखील बराच व्हायरल झाला आहे. सोबतच गेल्या महिन्यात अब्दूने त्याच्या रेस्टॉरंटच्या उद्घाटनावेळी लोडेड बंदूक बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे चर्चेत आला होता. मात्र, काही लोक खोट्या बातम्या पसरवून त्याचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com