Project K Actors Fee : प्रभास - दीपिकासह 'प्रोजेक्ट के'च्या कलाकारांनी किती घेतले मानधन ?

Project K Budget : चित्रपटाचं बजेट हे ६०० कोटी एवढे आहे.
Project K Stars Fees
Project K Stars FeesSaam TV
Published On

Prabhas, Deepika Padukone Project K Stars Fees : नाग अश्विन दिग्दर्शित 'प्रोजेक्ट के' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. 'प्रोजेक्ट के' चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास, कमल हसन तर बॉलिवूडचे दीपिका पदुकोन, अमिताभ बच्चन, दिशा पाटणी ही स्टाककास्ट असणार आहेत.

या चित्रपटातील कलाकारांमुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती पल्ला गाठतो हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे. चित्रपटासाठी या स्टार कलाकारांनी तेवढेच तगडे मानधन घेतले आहे.

नाग अश्विन हे नेहमी आपल्या चित्रपटात काही न काही नवीन करत असतात. आधीच्या चित्रपटापेक्षा नवीन चित्रपटात अजून काय करता येईल यावर नाग अश्विन भर देत असतात. मग ते चित्रपटातील कलाकार असो किंवा आणखी काही. नाग अश्विन नेहमी नवीन काहीतरी प्रेक्षकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. तसेच तात्यांनी या चित्रपटाबाबतही केलं आहे. (Latest Entertainment News)

Project K Stars Fees
Shah Rukh Khan - Suhana Share Screen : बाप - लेक एकत्र... सुहाना शाहरुखसोबत करणार मोठ्या पडद्यावर पदार्पण

नाग अश्विनच्या 'प्रजेक्ट के'बद्दल जाणून घ्यायला प्रेक्षक आतुर असल्याचे दिसत आहे. पिंकवीलाच्या वृत्तानुसार, 'प्रोजेक्ट के' हा सर्वात महागड्या चित्रपटांपैकी एक आहे. चित्रपटाचं बजेट हे ६०० कोटी एवढे आहे. त्यातील ४०० कोटी चित्रपटाच्या कामासाठी तर २०० कोटी कलाकारांच्या मानधनासाठी वापरले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर कलाकारांचे मानधन हे २०० कोटींपेक्षाही जास्त असल्याची माहिती समोर येत आहे.

मीडियाच्या वृत्तानुसार, चित्रपटासाठी कलाकारांनी भरपूर मानधन घेतल आहे. अमिताभ बच्चन यांनी १८ कोटींचं मानधन घेतले आहे. तर कमल हसन यांनी २० कोटी एवढे मानधन घेतले आहे. चित्रपटातील कलाकार दिपीका पदुकोनने २० कोटींच मानधन घेतले आहे. तर दिशा पाटणीने २ कोटींच मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे.

'प्रोजेक्ट के'साठी सर्वात जास्त मानधन सुपरस्टार प्रभासने घेतले आहे. प्रभासने तब्बल १५० कोटींचे मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे. प्रभासच्या फ्लॉप चित्रपटानंतर एवढे मानधन घेण्यावर चर्चा होत आहे.

ज्या एक अफवा अशी आहे की, प्रभासने 'आदिपुरूष'साठी १०० कोटी मानधन घेतले होते. तर 'राधे श्याम' चित्रपटासाठी ७० कोटींचं मानधन घेतले होते. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणं उत्सुकतेच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com