Pooja Sawant Wedding Plan: अखेर पूजा सावंतने लग्नाची तारीख सांगितली; 'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ

Pooja Sawant News: 'मी डेस्टिनेशन वेडिंग करणार नाही, मला मुंबईमध्येच लग्न करायचं आहे.' असं अभिनेत्री पूजा सावंतने डेस्टिनेशन वेडिंगबद्दल भाष्य केलं आहे.
Pooja Sawant Interview
Pooja Sawant InterviewInstagram

Pooja Sawant And Siddesh Chavan Wedding

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये पूजा सावंतची गणना केली जाते. पूजा सावंतने नोव्हेंबर २०२३ मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाची कबुली दिली. प्रेमाची कबुली दिल्यानंतर तिची आणि बॉयफ्रेंड सिद्धेशची एकमेकांसोबत ओळख कशी झाली, याबद्दलही माहिती तिने दिली. नुकतंच अभिनेत्रीला एका मुलाखतीमध्ये डेस्टिनेशन वेडिंगबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी तिने तिच्या लग्नाच्या ठिकाणाबद्दल भाष्य केलं आहे.

Pooja Sawant Interview
Oscar 2024: ऑस्करसाठी नामांकनाची यादी जाहीर! जाणून घ्या कोण-कोणत्या सिनेमांचा झाला समावेश

नुकतंच पूजा सावंतने 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला मुलाखत दिली. यावेळी, पूजाला तू डेस्टिनेशन वेडिंग कुठे करणार ? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली, "मी डेस्टिनेशन वेडिंग करणार नाही, मला मुंबईमध्येच लग्न करायचं आहे. खरंतर, डेस्टिनेशन वेडिंग ही संकल्पनाच खूप सुंदर आहे. कुठलं तरी एक निसर्गरम्य ठिकाण असतं, सगळी माणसं तिथे पोहोचतात. मी माझ्या कामासाठीच खूप प्रवास करते, त्यामुळे मला माझ्या लग्नाच्या दिवशी तरी धावपळ करायची नाही. त्यादिवशी मला सर्व आरामशीर हवं आहे."

"माझ्या लग्नाच्या दिवशी मला माझ्या घरी सकाळी लवकर उठायचं आहे. माझ्या आईच्या हातचा नाष्टा करायचा आहे आणि मग तयार होऊन लग्नाला जायचं आहे. माझ्या लग्नाच्या ठिकाणी माझ्या सर्व माणसांनी छान पोहोचावं. त्यांचा जो काही प्रवास असेल तो सुखकर व्हायला हवा. उगाच कुठे लग्न करतेय ही आता? असा प्रश्न मला कोणी विचारायला नको." असं अभिनेत्री मुलाखतीत म्हणाली.

Pooja Sawant Interview
Vaibhav Tatwawadi: यामी गौतमीच्या 'आर्टिकल 370' मध्ये मराठमोळा अभिनेता मुख्य भूमिकेत, टीझरमध्ये दिसली पहिली झलक

यावेळी पूजाने लग्न केव्हा करतेय हे सुद्धा सांगितलं, "मी सिद्धेशच्या सुट्टीसाठी थांबली आहे. तो फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये भारतात येणार आहे. तो आला की, आम्ही 'चट मंगनी पट ब्याह' अशा पद्धतीत लग्न करण्याची शक्यता आहे. पण आम्ही लग्न याच वर्षी करणार हे नक्की आहे. कारण पुढे मला सुद्धा वेळ नाही."

Pooja Sawant Interview
Saif Ali Khan Health: सैफ अली खानला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, अभिनेत्याचा सर्जरीनंतरचा फोटो व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com