MC Stan Big Boss 16 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Bigg Boss 16: 'बिग बॉस 16' चा स्पर्धक एमसी स्टॅनच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसैनिक भडकले, तोंडाला काळे फासण्याचा दिला इशारा

एमसी स्टँनच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा देखील चिंतामणी निवाटे यांनी दिला आहे.

Pooja Dange

Complaint File Against MC Stan: हिंदी कलर्स वाहिनीवरील रिॲलिटी शो बिग बॉस कार्यक्रमात सहभागी झालेल्या रॅपर एम सी स्टॅन् याने मुंबईतील खारदांडा भागाविषयी बोलताना "खारदांडा फकीर" असा उल्लेख केल्याने खारदांडा भागातील रहिवासी आक्रमक झाले आहेत.

आता या कलाकाराविषयी खारदांडा येथील मूळचा कोळी बांधव असलेल्या शिवसैनिकाने दिंडोशी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दिली आहे. कलर्स वाहिनीने या कलाकाराची कार्यक्रमातून हकालपट्टी करावी अन्यथा खारदांडा रहिवाशी एमसी स्टँनच्या तोंडाला काळे फासणार असा इशारा देखील चिंतामणी निवाटे यांनी दिला आहे. (Mumbai)

काल म्हणजे शुक्रवारी सलमान खानने 'शुक्रवार का वार' मध्ये एमसी स्टॅनला त्याची चूक दाखवून देताना दिसला. सलमान खान त्याला म्हणाला, दांडा जवळ आहे, खार जवळ आहे. बांद्रा फकीर सुद्धा म्हणायचं ना? खारदांड्याचे सगळे फकीर आहेत. तू पुण्याचं आहेस, तू पुण्याचे नाव नाही घेतलेस. का नाही घेतलेस?

एमसी स्टॅनने खारदांड्यातील सर्व लोक फाक्री आहेत, असे म्हटले होते. यावर सलमान खानने त्याला चांगलेच सुनावले. परंतु त्याच्या या वक्तव्यामुळे खारदांडा येथील कोळी नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. बांद्रा विधानसभेचे शिवसेनेचे उपविभाग प्रमुख चिंतामणी निवाटे यांनी दिंडोशी, मालाड येथील पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. लेखी पात्र आज एमसी स्टॅन विरोधात तक्रार दाखल केली आहे. (Police)

Letter

एमसी स्टॅनने मुंबईतील खारदांडा कोळीवाडा या गावठाणात वास्तव्य करीत असलेल्या आद्य नागरिक कोळी समाजास अतिशय खालच्या दर्जाची भाषा वापरून त्यांचा फकीर भिकारी या शब्दात उच्चार केला. त्यामुळे त्याची बिग बॉस मालिकेमधून हकालपट्टी करून त्याच्याविरुद्ध भूमिपुत्राबद्दल अपमानास्पद शब्द उच्चरल्याबद्दल त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तक्रारकऱ्यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj jarange patil protest live updates: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात

Gas and chest pain: छातीत वेदना झाल्या तर सावधान! गॅस आणि हार्ट अटॅकमधील खरा फरक समजून घ्या

EPFO: नोकरी बदलल्यावर PF खात्यातील पैसे काढताय? होऊ शकते नुकसान, भविष्यात येणार अडचण

Maratha Reservation : मनोज जरांगे यांचं मुंबईत उपोषण; बीडमध्ये मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यास सुरुवात

S S David Death : सिनेसृष्टीत खळबळ, प्रसिद्ध दिग्दर्शकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

SCROLL FOR NEXT