Jhund Saam TV
मनोरंजन बातम्या

Jhund: चाहत्यांमध्ये 'झुंड'ची धुंद; सिनेमागृहाबाहेर 'नागराज आणि बिग बीं'चे भलेमोठे फ्लेक्स

नागराज पोपटराव मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट 'झुंड' (Jhund) आज सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सैराट आणि फॅन्ड्री चित्रपटाने सिनेरसिकांना वेड लावणारे दिग्दर्शक म्हणजे नागराज पोपटराव मंजुळे यांचा बहुचर्चित चित्रपट 'झुंड' (Jhund) आज सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपट सिनेसृष्टीला आपल्या सिनेमांचे वेड लावणारे नागराज ( Nagraj Manjule) आता बॉलिवूडलाही (Bollywood) वेड लावण्यासाठी सज्ज झाले आहेत. तर मंजुळेंच्या चित्रपटाचे आमिर खानने देखील तोंड भरुन कौतुक केलं आहे.

अशातच आता सोलापुरातील (Solapur) नागराजच्या चाहत्यांनी तर हा सिनेमा डोक्यावर घेतला आहे. या चाहत्यांनी थिएटर बाहेर चक्क नागराज आणि महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे भले मोठे फ्लेक्स लावून 'झुंड' अक्षरशः साजरा केल्याचं चित्र पहायला मिळत आहे. भारतीय चित्रपट इतिहासात पहिल्यांदाच एका दिग्दर्शकाचे सिनेमागृहाच्या बाहेर फ्लेक्स लागले आहेत. सोलापुरातील इस्केवअर थेटरच्या बाहेर हे फ्लेक्स लावण्यात आले आहेत.

25 फूट उंच आणि 8 फूट रुंद फ्लेक्स

नागराज मंजुळे जेंव्हा सिनेमा पाहण्यासाठी सोलापुरात यायचा तेंव्हा यल्लादसी हे कलाकार बॉलिवुड अभिनेत्यांचे असे फ्लेक्स बनवून लावायचे. आता यल्लादासी यांचे सुपुत्र श्रीनिवास यल्लादसी यांनीच नागराज अण्णाचे फ्लेक्स बनवले आहेत. 25 फूट उंच आणि 8 फूट रुंद असे हे फ्लेक्स आहेत. सोलापूर शहरातील मुख्य चौकातच हे फ्लेक्स लागले असल्याने नागराज अण्णाच्या चाहत्यांसाठी हे फ्लेक्स एक आकर्षनाच केंद्र बनलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal ketu Yuti: मंगळ-केतूची अशुभ युती अखेर संपली; 'या' राशींचे सुरु होणार अच्छे दिन!

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

SCROLL FOR NEXT