Tips For Boys: 'या' 5 सवयी असणारी मूलं, मुलींना अजिबात आवडत नाहीत...

मुलींना मुलांच्या अनेक सवयी आवडतात (Habits) तसंच त्यांना मुलांच्या अनेक सवयींचा तिरस्कारही वाटतो.
Tips For Boys: 'या' 5 सवयी असणारी मूलं, मुलींना अजिबात आवडत नाहीत...
Tips For Boys: 'या' 5 सवयी असणारी मूलं, मुलींना अजिबात आवडत नाहीत...Saam TV

मुंबई : मुलगा आणि मुली एकमेकांकडे का आकर्षित होतात कारण त्यांना एकमेकांमधील अनेक सवयी आवडतात. मात्र अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत. तसंच मुली मुलं निवडत असताना अनेक गोष्टींकडे लक्ष ठेवतात. ज्याप्रमाणे मुलींना मुलांच्या अनेक सवयी आवडतात (Habits) तसंच त्यांना मुलांच्या अनेक सवयींचा तिरस्कारही वाटतो. तुम्हालाही या सवयी असतील तर समजून घ्या की तुम्हाला त्या ताबडतोब बदलण्याची गरज आहे.

मुलांना बदलायची गरज असणाऱ्या सवयी पुढीलप्रमाणे

खोटं बोलणारी मुले -

खोटं बोलणाऱ्या मुलांचा मुलींना खूप राग येतो. आणि जर तुम्ही तिच्यासोबत रिलेशनशीप (Relationship) मध्ये असाल तर तिला तुम्ही खोटं बोलेलं अजिबात सहन होत नाही आणि यामुळे तुमचं नातं खराब होऊ शकतं.

स्वत:च स्वत:ची प्रशंसा करणं -

Tips For Boys: 'या' 5 सवयी असणारी मूलं, मुलींना अजिबात आवडत नाहीत...
कुणी बॉयफ्रेंड देतं का? 100 मुलांना केलं डेट, तरीही मिळाला नाही बॉयफ्रेंड; ऐका मिस ग्रेट ब्रिटनची व्यथा

जी मुले नेहमी स्वत:बाबतच्या कोही गोष्टी कींवा आयुष्यातील किस्से ज्यातून त्याचा मोठेपणा दिसून येतो, आणि त्याद्वारे ते स्वतःची स्तुती करतात, मोठमोठं बोलतात अशी मुलं मुलींना अजिबात आवडत नाहीत. शिवाय असे लोक प्रत्येक गोष्ट त्यांच्या पद्धतीने समजून घेतात आणि त्यांची विचारसरणी इतरांवर लादायची असते असाही समज मुलींमध्ये होतो. मात्र जे समोरच्याचं ऐकतात अशी मुलींना खूप आवडतात.

नेहमी आपलंच खरं करणारे -

अनेकजणं स्वतःला परिपूर्ण समजतात. तसंच ते कोणत्याही परिस्थितीत तो नेहमी इतरांसमोर आपल्याला खूप माहीती अशल्य़ाचं भासवतो आणि त्याचप्रमाणे बोलतं असतो. तसंच आपली मतं त्यांच्यावर लादणारी मुलं त्याना आवडत नाहीत.

हे देखील पहा -

व्यसन करणारी मुलं -

तुम्हाला जर दारू, सिगारेट अशाप्रकारचं जर काही अमली पदार्थांचं व्यसन (Drugs) असेल आणि जर ते त्या मुलीला समजलं तर ती मुलगी तुम्हाला कधी स्विकारेल हे विसरून जा. मुली अशा मुलांचा खरच तिरस्कार करतात. व्यसनाधीनता केवळ तुमचे आयुष्यच खराब करत नाही तर मुलींशी संभाषण करण्याची संधी देखील संपवते. अशा परिस्थितीत तुम्हाला कोणत्याही मुलीच्या जवळ यायचे असेल तर या सवयी लगेच बदला.

जास्तीची पजेसिव असणारी मुलं -

प्रत्येक मुलीला स्वातंत्र्य आवडते आणि जर कोणी तिच्या स्वातंत्र्यावरती गदा आणत असेल तर तिला ते आवडत नाही. तिला संशयास्पद किंवा अति-सकारात्मक लोकांसोबत राहणं देखील आवडत नाही. मुलींना त्यांचे आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगणे आवडतं त्यामुळे सतत त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप केलेलं आवडतं नाही.

Edited By - Jadgish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com