Big Boss Marathi 5 canva
मनोरंजन बातम्या

Big Boss Marathi 5 : बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा राडा; ६ सदस्य नॉमिनेट, कुणाचा पत्ता कट होणार?

Big Boss Marathi Nominated Contestants: बिग बॉस मराठीच्या ७व्या ओठवड्यातील नॉमिनेशल टास्क पार पडला.सातव्या आठवड्यात घरातील ६ सदस्य नॉमिनेट झाले आहेत

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नव्या सदस्याची एन्ट्री झाली आहे. वाईल्ड कार्ड स्पर्धकने घरात प्रवेश करणाऱ्या संग्राम चौघुलेनं घरातील सदस्यांना धारेवर घरलं आहे. वाईल्ड कार्ड एन्ट्रीमुळे घरातील इतर सदस्यांच्या गेममध्ये मोठा फरक पडलेला दिसतोय. बिग बॉसच्या घरात निक्की तांबोळी आणि अरबाज हे दोघे चांगलेच गोत्याक आडकले आहेत. बिग बॉस मराठी सिझन ५चा सातवा आठवडा सुरु आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच दिलेल्या टास्कमध्ये काही स्पर्धकांनी घरातील नियम तोडले होते.

मंळवारी नॉमिनेशन टास्क पार पडला त्यादरम्यान घरातील सहा सदस्य नॉमिनेट झाले. वैभव चव्हाण, अंकिता वालावलकर, वर्षा उसगावकर, अभिजित सावंत, निक्की तांबोळी आणि आर्या जाधव हे सर्व सदस्य यंदाच्या आठवड्यासाठी नॉमिनेट झाले आहेत. बिग बॉसच्या घरातील काही सदस्यंमुळे बिग बॉसने काही सदस्यांना शिक्षा दिली आहे.

नॉमिनेशन टास्कचे सुत्रसंचालन वाईल्ड कार्ड एन्ट्रीने आलेल्या संग्राम चौघुले यानी केले होते. या टास्कमध्ये सर्व सदस्यांची इम्युनिटी एका जादुई दिव्यामध्ये बंदिस्त होती. परंतु घरातीस सर्व सदस्यांची इम्युनिटी दुसऱ्या सदस्यांच्या हातात होती. घरातील सदस्यांकडे ज्या सदस्यांचा दिवा आहे त्यांना नॉमिनेशनपासून वाचवायचं होतं. ज्या सदस्यांच्या हातामधील जादुई दिवा जिनीच्या हसण्याचा आवाज आल्यावर टेबलावर ठेवला जाणार नाही तो सदस्य थेट नॉमिनेट होईल असे सांगितले होते. टास्क दरम्यान सदस्यांमध्ये राडे झाले.

टास्क दरम्यान बिग बॉसने सर्व सदस्यांना खडसवलं आणि सातव्या आठवड्यातही तुम्ही खेळण्यास अपात्र आहात तुम्हाला खेळ कसा खेळायचा याची समज नाही असे सांगितले. अभिजीत, आर्या आणि वैभव यांच्या गोंधळामुळे अंतिम फेरीमध्ये ३ सदस्यांना नॉमिनेट केलं होतं. त्यानंतर सदस्यांमध्ये आरडाओरड आणि राडे पाहायला मिळाले होते. आता यंदाच्या आठवड्यात कोणता सदस्य बिग बॉसच्या घराला राम राम करणार हे पाहाणं रंजक ठरेल.

Edited By: Nirmiti Rasal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Sri Lanka : टीम इंडियाची सुपर ओव्हरमध्ये झुंजार खेळी, श्रीलंकेच्या तोंडून हिसकावला विजयाचा घास

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

SCROLL FOR NEXT