Bhool Bhulaiyaa 3 OTT Release SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bhool Bhulaiyaa 3 : रूह बाबा येणार आता तुमच्या घरी, 'भूल भुलैया ३' OTT रिलीजची तारीख ठरली!

Bhool Bhulaiyaa 3 OTT Release Date and Platform: हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया ३' थिएटर गाजवल्यानंतर आता लवकरच ओटीटीवर रिलीज होणार आहे.

Shreya Maskar

कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan ) हॉरर कॉमेडी चित्रपट 'भूल भुलैया ३' दिवाळीच्या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर रिलीज झाला आहे. 'भूल भुलैया ३' (Bhool Bhulaiyaa 3) 1 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा भूल भुलैयाचा तिसरा भाग आहे. पहिल्या दोन्ही भागांना चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळाले. तसेच या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर देखील बंपर कमाई केली आहे. 'भूल भुलैया ३' हा चित्रपट अनीस बज्मी यांनी दिग्दर्शित केला आहे. 'भूल भुलैया ३' ला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

'भूल भुलैया 3' हा चित्रपट थिएटर गाजवल्यानंतर आता ओटीटीवर धुमाकूळ घालायला सज्ज आहे. 'भूल भुलैया 3' चाहत्यांकडून भरपूर प्रेम मिळत आहे. कॉमेडी आणि हॉररचा भन्नाट अनुभव 'भूल भुलैया 3' प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3'नेटफ्लिक्स या ओटीटी ( OTT Release ) प्लॅटफॉर्म रिलीज होणार आहे. नेटफ्लिक्सने 'भूल भुलैया 3' चे स्ट्रीमिंग अधिकार विकत घेतले आहेत. 'भूल भुलैया 3' हा चित्रपट ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर म्हणजे डिसेंबर महिन्याची शेवटी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मात्र अद्याप याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही.

'भूल भुलैया 3' बॉक्स ऑफिस कलेक्शन

मीडिया रिपोर्टनुसार, 'भूल भुलैया 3' ने पहिल्या दिवशी 35.5 कोटी रुपये तर दुसऱ्या दिवशी 37 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर तिसऱ्या दिवशी 33.5 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले आहे. एकूण तीन दिवसात 'भूल भुलैया 3'ने 106 कोटींची बंपर कमाई केली आहे. 'भूल भुलैया 3'मध्ये कार्तिक आर्यन, विद्या बालन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी आणि राजपाल यादव हे कलाकार प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IDBI Recruitment: IDBI बँकेत नोकरीची संधी; १००० रिक्त पदांसाठी भरती; पात्रता आणि अर्जप्रक्रिया जाणून घ्या

Viral Video: बापरे...भेळ खाताना जपून, ट्रेनमधील बाथरूमजवळ कापला जातोय कच कच कांदा; किसळवाणा VIDEO व्हायरल

Maharashtra Weather Update: मुंबईत हवेची गुणवत्ता खराब, ग्रामीण भागात थंडी; महाराष्ट्रात आज कसे आहे हवामान?

Education Loan: उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय मिळणार ७.५ लाखांचे कर्ज; सरकारची नवी योजना काय आहे?

Maharashtra Politics: ...तर खपवून घेणार नाही, शरद पवारांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या सदाभाऊ खोतांना अजित पवारांचा इशारा

SCROLL FOR NEXT