Bhediya 2 and Stree 2 Announced Saam TV
मनोरंजन बातम्या

Bhediya 2-Stree 2 Movie: एकाच तिकिटात २ सिनेमे एकत्र... स्त्री आणि भेडिया येणार एकत्र.. हॉरर कॉमेडी सिनेमांची घोषणा

Bhediya 2 and Stree 2 Released Date: स्त्री 2 प्रदर्शित झाल्यानंतर भेडिया 2 येणार आहे हे निश्चित आहे.

Pooja Dange

Bhediya 2 and Stree 2 Announced: बॉलिवूडमध्ये आपण विविध धाटणीचे चित्रपटात पाहिले आहेत. परंतु सध्या हॉरर-कॉमेडी चित्रपट देखील प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे. श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी अभिनीत 'स्त्री'ने या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली होती. भारतात या चित्रपटाने 100 कोटींहून अधिक कमाई केली.

तर जान्हवी कपूर, राजकुमार राव आणि वरुण शर्मा अभिनीत रुही हॉरर कॉमेडी हा चित्रपट कोविड-19 दरम्यान प्रदर्शित झाला होता. तरीही या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बऱ्यापैकी यश मिळाले.

वरूण धवन आणि क्रिती सॅनन अभिनीत भेडियाने देखील प्रेक्षकांना आवडला. मॅडॉक फिल्म्स, एक महत्त्वाकांक्षी प्रोडक्शन हाऊस असल्याने, त्यांच्या हॉरर-कॉमेडी त्यांनी त्यांच्या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

हॉरर-कॉमेडी जगतातील सर्वात यशस्वी स्त्री, चित्रपटाचा स्त्री 2 नावाच्या सिक्वेलसाठी तयारी करत आहे. मूळ चित्रपट रिलीज झाल्यानंतर सहा वर्षांनंतर हा चित्रपट 31 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होईल. या वर्षाच्या शेवटी हा सुरू होईल.

श्रद्धा कपूर, राजकुमार राव आणि पंकज त्रिपाठी अनुक्रमे स्त्री, विकी आणि रुद्र यांच्या भूमिका साकारणार आहेत. स्त्री ही व्यक्तिरेखा भेडियामधील ठुमकेश्वरी गाण्यातही दिसली होती.

स्त्री 2 प्रदर्शित झाल्यानंतर भेडिया 2 येणार आहे हे निश्चित आहे. दोन्ही चित्रपटांची कथा एकमेकांशी जोडलेली आहे. वरुण धवन आणि क्रिती सेनन, भास्कर आणि डॉ अंकिताच्या भूमिकेत पुन्हा दिसतील. हा चित्रपट 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे. ऋषी चित्रपटामध्ये दिसलेले भूत म्हणजे जान्हवी कपूर, स्त्री 2 आणि भेडिया 2 मध्ये दिसले तर आश्चर्य वाटणार नाही.

हॉरर-कॉमेडीला भारतात खूप यश मिळाले आहे. राघव लॉरेन्सची कांचना मालिका, रजनीकांतची चंद्रमुखी आणि रोहित शेट्टीच्या गोलमाल अगेनने या चित्रपटांनी दाखवून दिले आहे हॉरर कॉमेडी चित्रपट भारतीय प्रेक्षकांना आवडतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: सरकारी नोकर भरतीचे नियम मधेच बदलता येणार नाहीत; सुप्रीम कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Maharashtra News Live Updates: पुण्याचे आबा बागुल, व्यवहारे, आनंद ६ वर्षांसाठी निलंबित, काँग्रेसची धडक कारवाई

Success Story: ड्रिंक पिताना आली भन्नाट आयडिया; देसी ड्रिंकला ब्रँड बनवून ३ भाऊ झाले कोट्यवधींच्या कंपनीचे मालक

कांदा कापताना डोळ्यांतून पाणी का येते?

Shweta Tiwari: सौंदर्य अन् वय पाहून म्हणाल; ही तर विशीतली पोर

SCROLL FOR NEXT