banjara Saam Tv
मनोरंजन बातम्या

Banjara: निसर्गात हरवून, मैत्रीत रंगणार; 'बंजारा' मधील 'कम ऑन लेट्स डान्स' गाणे प्रदर्शित

Banjara Movie: मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या ‘बंजारा’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘कम ऑन लेट्स डान्स’ नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

Shruti Vilas Kadam

Banjara: मैत्री, आत्मशोध आणि निसर्गाच्या कुशीत घडणाऱ्या प्रवासाची कहाणी सांगणाऱ्या ‘बंजारा’ या चित्रपटातील नवीन गाणे ‘कम ऑन लेट्स डान्स’ नुकतेच प्रदर्शित झाले असून त्यातील धमाल, मस्ती आणि उत्साहाने भरलेला माहोल प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या एनर्जेटिक आवाजातील या गाण्याला अवधूत गुप्ते यांचे संगीत लाभले आहे. तर गुरू ठाकूर यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे. गाण्यात तीन मित्रांचा सिक्कीमच्या डोंगरदऱ्यांमधील प्रवास पाहायला मिळत आहे. आयुष्यातील हे मौल्यवान क्षण जगताना ते दिसत आहेत.

दिग्दर्शक स्नेह पोंक्षे म्हणतो, “ कमऑन लेट्स डान्स’ हे आयुष्यातील टेन्शन विसरून जगण्याचा मंत्र देणारे गाणे आहे. या गाण्यातील मित्रांसोबतचा मजेशीर प्रवास, त्यांच्यासोबतचे मजेशीर क्षण पाहाताना प्रेक्षकांनाही त्यांच्या मित्रांबरोबर लुटलेल्या आनंदाची आठवण होईल हे नक्की. तसेच एव्हरग्रीन सोनू निगम यांनी हे गाणे गायल्याने या गाण्याला अजूनच रंगत आली आहे.”

शरद पोंक्षे म्हणतात, “ज्याप्रमाणे ‘बंजारा’ हा चित्रपट प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील एका प्रवासाची आठवण करून देतो, तसेच हे गाणेही प्रेक्षकांच्या तरुणपणातील आठवणींना, मैत्रीला उजाळा देणारे आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. तसेच हे गाणे देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा करतो. तीन मित्रांचा हा रोमांचक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, याची मला खात्री आहे.”

मोरया प्रॉडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोंक्षे यांचे आहे. प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोंक्षे, भरत जाधव, सुनील बर्वे, स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार असून, निर्मिती रोहिणी विजयसिंह पटवर्धन आहे. शरद पोंक्षे प्रस्तुत हा चित्रपट येत्या १६ मे रोजी प्रदर्शित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT