Bella ciao: Money Heist 5 वेब सिरीज आज Netflix वर रिलीज होणार twitter/@NetflixIndia
मनोरंजन बातम्या

Bella ciao: Money Heist 5 वेब सिरीज आज Netflix वर रिलीज होणार

मनी हाईस्ट या जगप्रसिद्ध वेब सिरीजमधील Bella ciao, bella ciao, bella ciao ciao ciao हे लोकप्रिय गाणं समजत नसलं तरी Money Heist च्या चाहत्यांच्या ओठांवर नेहमीच असतं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Money Heist च्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे. जगप्रसिद्ध वेबसिरीज मनी हाईस्टचा पाचवा सिजन (money heist season 5) व्हॉल्यूम १ आज दुपारी १२:३० वाजता नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. या सिरीजचा हा शेवटचा सिजन असल्याने त्यामुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. या सिरीजचा पाचव्या भागातील व्हॉल्यूम १ आज म्हणजे ३ सप्टेंबरला रिलीज होत आहे तर व्हॉल्यूम २ हा ३ डिसेंबरला रिलीज होणार आहे. (Bella ciao: Money Heist 5 web series will be released on Netflix today)

हे देखील पहा -

व्हॉल्यूम १ मध्ये पाच भाग असतील. क्राईम, अॅक्शन, थ्रिलर, सायन्स, टेक्नॉलॉजी, रोमॅन्स अशा सर्व प्रकारचा मिक्स कंटेंट या सिरीजमध्ये असल्याने याची क्रेज वेगळीच आहे. यातील '' Bella ciao'' गे गाणं मनी हाईस्ट आवडणाऱ्या प्रत्येकाच्या ओठांवर असतं. मनी हाईस्ट ही सीरिज मूळ स्पॅनिश मध्ये आहे. त्यामधील प्रोफेसरची भूमिका अल्वारो मॉर्टे यांनी साकारली आहे. या मालिकेतील सर्वांच्याच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या असून त्याचे जगभरात त्याची क्रेज आहे.

पहा ट्रेलर -

मनी हाईस्टचा चौथा सिजनमध्ये एकीकडे प्रोफेसरची टीम बॅंक ऑफ स्पेनमध्ये फसली आहे तर दुसरीकडे इन्फेक्टर अॅलिसियाने प्रोफेसरचा पत्ता शोधून काढून त्याच्यावर बंदुक रोखली आहे. आता अशा स्थितीत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रत्येकजण आतुर आहे. पाचव्या सीजनचा आज रिलिज होत असल्याने चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.

मनी हाईस्ट पाहण्यासाठी या कंपनीने दिली सुट्टी

या वेबसिरीजची क्रेज इतकी आहे की, जयपूरमधील एका आयटी कंपनीने खास ही वेब सिरीज पाहण्यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांना एक दिवसाची सुट्टी जाहिर केली आहे. व्हर्व लॉजिक नावाच्या या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ३ सप्टेंबरला एका दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. Netflix and Chill या नावाने कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना मेल पाठवला असून त्यामध्ये मनी हाईस्टच्या पाचव्या सीनजचा आनंद घेण्याचा सल्ला दिला आहे. कंपनीने पाठवलेल्या या मेलचा स्क्रीनशॉट चांगलाच व्हायरल झाला आहे.

व्हर्व लॉजिक नावाच्या या कंपनीने Netflix and Chill या सब्जेक्टने आपल्या कर्मचाऱ्यांना ई मेलमध्ये पाठवलाय. त्यात म्हटलंय की, "सुट्टीसाठी करण्यात येणारे खोट्या मेल, अनेक कर्मचारी एकाच वेळी सुट्टीवर जाणे, कामावर न येता फोन स्वीच ऑफ करणे या गोष्टींपासून वाचण्यासाठी आम्ही आपल्याला सुट्टी देत नाही आहोत. कधी कधी 'चिल मारणे' हे देखील आपल्या कामाची क्षमता वाढवण्यासाठी उपयोगी आहे याची जाणीव कंपनीला आहे."

असा मजेशीर ई मेल कंपनीने पाठवल्यानंतर अनेकजण या कंपनीमध्ये जॉबसाठी काय करावं लागेल अशी विचारणा करतायत. तेव्हा उद्याचा शनिवार आणि परवाचा रविवार हे दिवस तुम्ही या वेबसिरीजसाठी सार्थकी लावू शकता. अर्थात तुमची इच्छा असेल तर...

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : अलका टॉकीज चौकात "श्रीमंत" दाखल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

ITR Filing : टॅक्स रिफंड परताव्याचा फॉर्म अडकून पडलाय? मग 'या' गोष्टी एकदा तपासाच

Akola Accident: गणेश विसर्जन करून परताना भक्तांवर काळाचा घाला; तरुणाचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT