काबुल: आज संपुर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानकडे (Afganistan) असणार आहे. त्याचं कारण म्हणजे तालिबान आज स्वतःचं (Taliban Government) सरकार स्थापन करणार आहे. अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्याच्या दोन आठवड्यानंतर आज तालिबान सरकार स्थापन करेल. (Islamic Emirate of Afghanistan) दुपारची नमाज (प्रार्थना) झाल्यानंतर नव्या सरकारची घोषणा होऊ शकते. अफगाणिस्तानच्या इतिहासातील ही एक मोठी घटना ठरणार आहे. त्यामुळे भारतासह संपुर्ण जगाचं लक्ष अफगाणिस्तानकडे असणार आहे. तालिबानचा सर्वोच्च नेता मुल्ला हिबातुल्ला अखुंदजादा (mullah akhundzada) तालिबान सरकारचा सुप्रीम नेता म्हणून घोषीत केलं जाण्याची शक्यता आहे. (This time the Taliban government! The Taliban will form the government today)
हे देखील पहा -
भारताच्या स्वातंत्र्यादिनी म्हणजेच १५ ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुल (kabul) शहरावर कब्जा केला. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ (Ashraf Ghani) घनी यांनी आपल्या कुटुंबासह देश सोडला आणि हाच तालिबानचा विजय मानला गेला. मात्र अफगाणिस्तामनधील अमेरिकी नागरिकांना तसेच इतर देशाच्या नागरिकांना रेस्क्यु करण्यासाठी अमेरिकेने (US Air Force) काबुलमधील हमीद करजाई आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतले होते. सुमारे सहा हजार अमेरिकन सैन्याने काबुल एअरपोर्टचा ताबा घेतला होता.
दररोज अनेक विमानांनी लोकांना एअरलिफ्ट केले जात होते. यादरम्यान तालिबाननेही विमानतळाला चारही बाजुंनी वेढा दिला होता. भारतानेही अमेरिकेच्या सुरक्षेत आपली विमानं पाठवून शेकडो नागरिकांना रेस्क्यु केले होते. तालिबानने अमेरिकेला देश सोडण्यासाठी ३१ ऑगस्टची डेडलाईन दिली होती. मात्र अमेरिकेने एक दिवस आधीच म्हणजे ३० ऑगस्टला अफगाणिस्तान सोडले. यादरम्यान जगातील एक लाखांपेक्षा जास्त नागरिकांना रेस्क्यु केल्याचे अमेरिकेने सांगितले. अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर आज ३ सप्टेंबर २०२१ रोजी २० वर्षांनी तालिबान पुन्हा सत्तेत आले आहे.
पंजशीर अजूनही अजिंक्यच!
तालिबानने संपुर्ण देशाचा ताबा घेतला घेतला असला तरीही पंजशीर (Panjsheer) प्रांत अजूनही तालिबानला काबिज करता आलेला नाही. याआधीही जेव्हा तालिबान सत्तेत होते तेव्हाही हा प्रांत तालिबानला जिंकता आला नव्हता. तालिबानला कडवा विरोध करणारा हा प्रांत सध्यातरी तालिबानच्या ताब्यात नाही. नॉर्दन अलायन्सचे (northern alliance) प्रमुख राहिलेले माजी मुजाहिद्दीन कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद (ahmad massoud panjshir valley) हे तालिबानला शरण जाण्यास तयार नाही, त्यामुळे ते जोरदार प्रतिकार करत आहेत. त्यांच्यासोबत माजी उपराष्ट्रपती तथा काळजीवाहू राष्ट्रपती अमरुल्लाह सालेह (amrullah saleh) आणि बल्ख प्रांताचे माजी गव्हर्नर यांची तुकडीदेखील आहे.
पंजशीरमध्ये ९ हजार बंडखोर सैनिक आहेत. २३ ऑगस्टला तालिबानने पंजशीरवर हल्ला केला, मात्र याच तालिबानचे ३०० सैनिक मारले गेले. त्यामुळे पंजशीर प्रांत अजून किती काळ अजिंक्य राहतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.