Kangana Ranaut News Saam TV
मनोरंजन बातम्या

Kangana Ranaut On Twitter: अकाउंट सस्पेंड असतानाही ट्विटरच्या समर्थनात कंगनानेकेली पोस्ट

इंस्टाग्राम स्टोरीद्वारे कंगनाने ट्विटरच्या नव्या नियमांचे स्वागत केले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Kangana Ranaut Latest News: कंगना रनौत सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. ती वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन चित्रपटासाठी लोकेशन शोधत आहे. कंगना तिच्या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन देखील करणार आहे. इतकी व्यस्त असताना देखील कंगना वेगवेगळी मुद्द्यावर तिचे मत मांडत असते. यावेळी इंस्टाग्राम स्टोरीद्वारे कंगनाने ट्विटरच्या नव्या नियमांचे स्वागत केले आहे. तसेच तिने ट्विटरचे नियम योग्य आहेत सांगत त्यांचे फायदेही सांगितले आहे. कंगन जरी ट्विटरचे समर्थन करत असली तरी तिचे ट्विटर अकाउंट सस्पेंडच आहे.

ट्विटर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. ट्विटरचे नवे मालक इलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर ट्विटरच्या नियमात बदल करण्यास सुरूवात केली आहे. ट्विटरच्या नवीन नियमांनुसार आता ब्लू टिक म्हणजेच व्हेरिफाईड अकाउंटला पैसे द्यावे लागणार आहेत. ट्विटर पहिल्यांदाच युजर्सकडून पैसे घेणार आहे. कंगना रनौतने याबाबत तिचं मत मांडलं आहे. (Twitter)

कंगना ट्विटरचे समर्थन करत म्हणाली आहे, जर ट्विटर आपले अखंडत्व राखण्यासाठी पैसे घेत असेल तर ही मोठी गोष्ट नाही. असे केल्याने युजर्सना फायदा होईल. तसेच ट्विटरवरचे फायदे मोफत मिळणार नाहीत. कंगनाने तिच्या इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये कंगनाने ट्विटरचा पैसे घेण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. यामुळे यूजर्सना डेटा लीकसारख्या समस्यांपासूनही सुटका मिळेल आणि त्यांना चांगला अनुभवही मिळेल. (Kangana Ranaut)

Kangana Ranaut Instagrm Story

कंगना रनौत सतत चर्चेत असते. कंगना रनौत सध्या ‘इमर्जन्सी’ या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. चित्रपटाच्या शूटिंगचे लोकेशन पाहण्यासाठी कंगना सतत फिरत करत असते. कंगना नेहमीच तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतीच कंगना चित्रपटाच्या शूटिंगच्या ठिकाणी रेकी करण्यासाठी पोहोचली होती. त्याचे फोटोही कंगनाने इंस्टाग्रामवर शेअर केले होते. (Movie)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

मुंबईत भाजपचा महापौर बसणार? महायुती मॅजिक फिगरच्या पार, पाहा एक्झिट पोल, VIDEO

Jalgaon Municipal Election Exit Poll: खान्देशातील सर्वात मोठ्या महापालिकेवर कोणाचा झेंडा फडकणार?

SCROLL FOR NEXT