Producer Vipul Amrutlal Shah Security Upgrade Instagram
मनोरंजन बातम्या

Vipul Shah Security Upgraded: ‘केरळा स्टोरी’नंतर अदा शर्माचा नवीन चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात, धमकीच्या फोननंतर निर्मात्यांची सुरक्षा वाढली

Bastar Film Producer Vipul Shah News: निर्माते विपुल शाह यांनी नव्या चित्रपटाची घोषणा केल्यानंतर धमक्यांचा फोन येत आहे.

Chetan Bodke

Producer Vipul Amrutlal Shah Security Upgrade

निर्माते विपुल शाह सध्या सोशल मीडियावर त्यांच्या आगामी चित्रपटामुळे प्रकाशझोतात आहेत. ‘द केरळा स्टोरी’च्या अभुतपूर्व यशानंतर दिग्दर्शक- निर्माते विपुल शाह यांनी ‘बस्तर’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपूर्वी घोषणा केली. ‘द केरळा स्टोरी’च्या टीमने पुन्हा एकदा सत्य घटनेवर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच निर्मात्यांना धमक्यांचा फोन येत असून त्यांच्या सेक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. अदा शर्मा प्रमुख भूमिकेत असलेल्या चित्रपटाची कथा नक्षलवादाच्या विषयावर आधारित आहे. चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाच्या कास्ट क्रुच्या हजेरीमध्ये चित्रपटाचा मुहूर्त पार पडला होता. अमर उजालाच्या वृत्तानुसार, चित्रपटाची घोषणा केल्यापासूनच निर्मात्यांना धमक्यांचे फोन येत आहेत. धमक्यांच्या फोनचे प्रमाण गेल्या काही दिवसात वाढल्यामुळे दिग्दर्शकांच्या घराच्या सेक्युरिटीमध्ये वाढ करण्यात आली आहे.

चित्रपट निर्मात्यांनी सेक्युरिटीसाठी पोलिस अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला आहे की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. ‘द केरळ स्टोरी’ दरम्यानही चित्रपट निर्मात्यांना अशाच पद्धतीच्या धमक्या मिळाल्या होत्या. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झाली होती. लास्ट मंक मीडियाच्या सहकार्याने सनशाईन पिक्चर्सने निर्मिती केली आहे. चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात ५ एप्रिल २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनोज जरांगे पाटील त्यांच्या राहत्या घरी पोहोचले

Bengali white saree: दुर्गापूजेला बंगाली महिला लाल बॉर्डर असलेली पांढरी साडी का नेसतात? जाणून घ्या खरं कारणं

Maratha Reservation: मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री,कोल्हापूर गॅझेटीयरमध्ये नेमकं काय?

Jalgaon Stone Pelting: जळगावमध्ये मिरवणुकीदरम्यान दोन गटात दगडफेक

TikTok भारतात पुन्हा सुरू होणार का? खुद्द मोदी सरकारमधील मंत्र्यानं दिली नेमकी माहिती

SCROLL FOR NEXT