Bandar Teaser: बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल सध्या त्यांच्या आगामी ‘बंदर’ या चित्रपटामुळे जोरदार चर्चेत आहेत. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, या टीझरमध्ये बॉबी देओल यांचा पूर्णपणे वेगळा आणि कधीही न पाहिलेला अवतार पाहायला मिळत आहे.
‘बंदर’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी केले आहे. या चित्रपटात बॉबी देओल एका अनोख्या आणि विचित्र भूमिकेत दिसणार आहेत. टीझरमध्ये तो एका रॉकस्टारसारख्या स्टाइलिश लूकमध्ये दिसतो, पण कथानक जसजसे पुढे सरकते तसतसा त्याचा टोन डार्क आणि रहस्यमय होत जातो.
कथानकाबद्दल बोलायचं झालं तर, हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. बॉबी देओल यांनी साकारलेला पात्र डेटिंग अॅपच्या जाळ्यात अडकतो आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात मोठे वळण येते. या घटनांमुळे त्याच्या आयुष्यात गोंधळ, वाद आणि नाट्यमय परिस्थिती निर्माण होते.
टीझरमध्ये दाखवलेले व्हिज्युअल्स, बॅकग्राउंड म्युझिक आणि कथानकातील ट्विस्ट यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी या टीझरला “गूसबम्प्स देणारा” आणि “लॉर्ड बॉबीचा तुफान कमबॅक” असे कमेंट करत कौतुक केले आहेत.
या चित्रपटात बॉबी देओलसोबत सान्या मल्होत्रा, सपना पब्बी, सबा आझाद यांसारखे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'बंदर'ची कथा सुदीप शर्मा आणि अभिषेक बॅनर्जी यांनी लिहिली आहे. या दोघांनी यापूर्वी 'पाताल लोक', 'कोहरा' आणि 'उडता पंजाब' यांसारख्या उत्कृष्ट कथा लिहिल्या आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. एकूणच, बॉबी देओल यांचा हा नवीन अवतार आणि अनुराग कश्यप यांची दिग्दर्शकीय शैली यामुळे ‘बंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी एक वेगळा आणि थरारक अनुभव ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.