Tiger Shroff News Instagram
मनोरंजन बातम्या

Tiger Shroff : टायगर श्रॉफला मोठा झटका, 'बडे मियाँ छोटे मियाँ' फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्यांकडून फीसमध्ये कपात

Bade Miyan Chhote Miyan Flopped : 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या फ्लॉपचा फटका आता टायगर श्रॉफच्या करिअरवरही होण्याची शक्यता आहे. करियर पाहता निर्मात्यांनी टायगरच्या फीमध्ये कपात करण्याचा सल्ला दिला.

Chetan Bodke

बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या ॲक्शन सीन्समुळे अभिनेता टायगर श्रॉफ चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपूर्वीच टायगरचा बॉक्स ऑफिसवर 'बडे मियाँ छोटे मियाँ' रिलीज झालेला होता. त्याच्यासोबत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारही मुख्य भूमिकेत होता. ३५० कोटी बजेट असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुटपुंजीच कमाई केली होती. 'बडे मियाँ छोटे मियाँ'च्या फ्लॉपचा फटका आता टायगर श्रॉफच्या करिअरवरही होण्याची शक्यता आहे. टायगरचं करियर पाहता निर्मात्यांनी त्याच्या फीमध्ये खूप मोठी कपात करायला लावली होती.

लवकरच टायगर अजय देवगणच्या 'सिंगम अगेन'मध्ये कॅमियो रोलमध्ये दिसणार आहे. पण या व्यतिरिक्त टायगरकडे सध्या कोणताही चित्रपट नाही. 'बडे मियाँ छोटे मियाँ'नंतर टायगर सिद्धार्थ आनंद निर्मित 'रॅम्बो' चित्रपटावर काम सुरू करणार होता. 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची कमाई पाहून जिओ स्टुडिओने टायगरसोबत सध्या कोणताही महागडा चित्रपट बनवायचा नाही, असा निर्णय घेतला. त्या चित्रपटाची निर्मिती सिद्धार्थ आनंद करणार होते.

टायगर एका चित्रपटासाठी कोट्यवधींचे मानधन आकारतो. 'बडे मियाँ छोटे मियाँ'मुळे त्याच्या ११ वर्षांच्या करियरला हानी पोहोचण्याची शक्यता आहे. टायगरच्या ११ वर्षांच्या सिनेकरियरमध्ये ६ चित्रपट फ्लॉप ठरलेले आहेत. अभिनेत्याचा सिनेकरियरमधील ग्राफ पाहून त्याला काही निर्मात्यांनी मानधनामध्ये कपात करण्याचा सल्ला दिला आहे. बॅक टू बॅक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्याची मार्केट व्हॅल्यू कमी झालेली आहे.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, टायगरने सलग तीन फ्लॉप चित्रपट दिल्यानंतर निर्मात्यांनी त्याच्या फीमध्ये कपात करण्याचा सल्ला दिला होता. एका बड्या निर्मात्यांनी टायगरची तब्बल ७० % फी कमी करण्याचा विचार केला होता. टायगरने खरंतर ९ कोटी इतकं मानधन घ्यायला हवं, असं त्यांचं मत होतं. 'बडे मियाँ छोटे मियाँ' साठी टायगरने ३० कोटी इतकं मानधन घेतले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

GK: महिलांनी साष्टांग नमस्कार का टाळावा? काय आहे यामागचं शास्त्रीय कारण

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेन धुत

Akola News : लग्नाचं आमिष दाखवतं कॅफेत घेऊन गेला; २९ वर्षीय तरुणाचे ३३ वर्षीय महिलेवर अत्याचार

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT