Baby John Jackie Shroff Villain Google
मनोरंजन बातम्या

Baby John: हिरोपेक्षा व्हिलन भारी! अख्या चित्रपटात धडकी भरवणाऱ्या व्हिलनवर प्रेक्षक फिदा

Baby John Jackie Shroff Villain : बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेला बिग बजेट 'बेबी जॉन' चित्रपट हा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपट रिलीज झाल्यापासून खलनायकाचे खूप कौतुक होत आहे.

Bharat Jadhav

बॉलिवूडचा ॲक्शन ड्रामा 'बेबी जॉन' दोन दिवसांपूर्वी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. यावर्षीच्या बिग बजेट चित्रपटांपैकी एक असलेल्या 'बेबी जॉन'ची धमक चित्रपटगृहांमध्ये दिसत नाहीये. या चित्रपटात वरुण धवन, कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याआधीही या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, परंतु या चित्रपटाला प्रेक्षक मिळतच नाहीयेत.

१८० कोटी रुपयांच्या प्रचंड बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कथा प्रभावी नाहीये. परंतु कलाकारांच्या अभिनय मात्र धमाकेदार झालाय. कमकुवत कथा असूनही चित्रपटातील कलाकारांनी दमदार अभिनय केलाय. या चित्रपटात दिसणारा लीड हिरो वरुण धवनचा सर्वात दमदार परफॉर्मन्स यात पाहिला मिळत आहे. परंतु चित्रपटातील खलनायकाने त्याच्या पेक्षा जास्त भाव खात आहे.

प्रेक्षकांकडून खलनायकाच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. 'बेबी जॉन'च्या खलनायकाचे त्याच्या अभिनयाचे आणि त्याच्या लूकचे कौतुक होत आहे. खलनायकाचा लूक खूपच जबरदस्त आहे. त्याचा लूक आणि भूमिका पाहून धडकी भरते. बेबी जॉन या चित्रपटात खलनायकाची भूमिका जग्गू दादा म्हणजे जॅकी श्रॉफ यांनी केलीय. जॅकी श्रॉफने नेहमीच आपल्या लूकने लोकांची मने जिंकली आहेत.

जॅकी श्रॉफ त्याच्या काळातील सर्वात देखणा हिरो होता. जॅकी श्रॉफचा लूक खूपच खतरनाक आहे. डोळ्यात काजळ, लांब केस, तोंडात सिगार आणि पांढऱ्या रंगाचं धोतर अशा लूकमध्ये जॅकी श्रॉफ जबरदस्त प्रभाव पाडत आहे. जॅकीच्या लूकप्रमाणे त्याचा अभिनयही प्रभावी आहे. शिगार घट्ट करण्यापासून ते केस बांधण्याची स्टाईल सर्वांना भावत आहे. या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​नाव बब्बर शेर आहे.

या नावाप्रमाणेच तो कोणालाही घाबरत नाही. दरम्यान याआधीही जॅकी श्रॉफ अशाच दमदार खलनायकाच्या भूमिकेत दिसलाय. 'सिंघम अगेन' आणि 'सूर्यवंशी'मध्येही त्याचा अभिनय लोकांना आवडला. आता पुन्हा एकदा तो खलनायक बनून लोकांची मने जिंकत आहे. त्याच्याशिवाय या चित्रपटात राजपाल यादवची भूमिकाही खूप पसंत केली जात आहे.

या चित्रपटाने रिलीजच्या पहिल्या दिवशी ११.२५ कोटींची कमाई केली आहे. नाताळच्या सुट्टीत हा चित्रपट मोठी कमाई करेल असं वाटत होतं परंतु तसं झालं नाही. दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झालीय. हा चित्रपट केवळ ५.१३ कोटींची कमाई करू शकला. दोन दिवसांची निव्वळ कमाई १६.३८ कोटी रुपये होती. 'बेबी जॉन' हा थलपथी विजयच्या 'थेरी' चित्रपटाचा रिमेक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Mahadevi Elephant: महादेवी' हत्तीणीचा वनताराकडे प्रवास सुरू; ग्रामस्थ भडकले पोलीस गाड्यांची तोडफोड

Bachchu Kadu: श्रीकृष्णाने कालियाला ठेचलं, तसं आम्ही सरकारचं नागधोरण ठेचू" – बच्चू कडूंचा इशारा | VIDEO

Maharashtra Politics: महामंडळावर निवडणुकीनंतरच नियुक्ती, इच्छुकांच्या पदरी पुन्हा निराशा

Pandharpur News: चंद्रभागेच्या पाण्याची तीर्थ म्हणून विक्री; सुरक्षा कर्मचाऱ्यांचा गोरखधंदा उघड

Maharashtra Politics :...तर सोलापुरातून तिरुपतीसाठीही विमान सेवा सुरू होणार; जयकुमार गोरेंचा प्रणिती शिंदेंना टोला

SCROLL FOR NEXT