Baby John Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Baby John Collection : वरुण धवनच्या 'बेबी जॉन'ची निराशाजनक कामगिरी, वीकेंडचा आकडा किती ?

Baby John Box Office Collection Day 4 : सध्या बॉक्स ऑफिसवर 'पुष्पा 2' चित्रपटासोबत बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा 'बेबी जॉन' हा चित्रपट देखील पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने वीकेंडला किती कमावले जाणून घ्या.

Shreya Maskar

सध्या बॉक्स ऑफिसवर पुष्पा भाऊचा जलवा पाहायला मिळत आहे. 'पुष्पा 2' (Pushpa 2: The Rule) चित्रपट 5 डिसेंबरला रिलीज झाला. पहिल्या दिवसापासून चित्रपटाने बंपर कमाई केली आहे. आता ख्रिसमसच्या मुहूर्तावर वरुण धवनचा 'बेबी जॉन' (Baby John) चित्रपट रिलीज झाला आहे. वरुणची चित्रपटातील ॲक्शन चाहत्यांना खूप आवडली आहे.

बॉलिवूड अभिनेता वरुण धवनचा 'बेबी जॉन' 25 डिसेंबरला ख्रिसमसच्या मुहूर्तावर रिलीज झाला. चित्रपटाने पहिल्या दिवशी बंपर कमाई केली. मात्र दुसऱ्या दिवसापासून चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये घसरण पाहायला मिळाली आहे. या चित्रपटात सलमान खान चा कॅमिओ देखील पाहायला मिळाला आहे.

'बेबी जॉन' बॉक्स ऑफिस कलेक्शन डे 4

वरुण धवनचा (Varun Dhawan ) 'बेबी जॉन' चित्रपट 180 कोटींच्या बजेटमध्ये तयार झाला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटाने 11.25 कोटींची ओपनिंग केली आहे. दुसऱ्या दिवशी 4.75 कोटी आणि तिसऱ्या दिवशी 3.65 कोटी कमावले आहे. या चित्रपटाने चौथ्या दिवशी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत चित्रपटाने 23.90 कोटी रुपयांचे कलेक्शन (Baby John Box Office Collection Day 4) केले आहे.

'बेबी जॉन' चित्रपटात वरुणसोबत कीर्ती सुरेश आणि वामिका गब्बी हे स्टार देखील पाहायला मिळत आहे. 'बेबी जॉन' हा ॲक्शन चित्रपट आहे. 'बेबी जॉन'चित्रपटाचे निर्माते अ‍ॅटली आहेत.'बेबी जॉन' हा चित्रपट साऊथच्या 'थेरी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. रविवारी तरी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवेल का? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT