Baby John : सलमान खान ॲटलीच्या चित्रपटात कॅमिओ पुरताच की प्रेक्षकांना मिळणार आणखी मोठं सरप्राईज !

Baby John Surprise : वरुण धवनच्या चित्रपटात बेबी जॉन जेव्हा 'भाईजान'ला भेटतो तेव्हा प्रेक्षकांना असे वाटते की त्यांचे तिकिटाचे पैसे वसूल झाले पण ॲटलीने सलमान खानला आपल्या चित्रपटात कॅमिओ करायला आणले आहे का?
Baby john and salman khan
Baby john and salman khanSaam TV
Published On

Baby John : वरुण धवनच्या 'बेबी जॉन' या चित्रपटात आपल्याला बॉलिवूडचा 'भाईजान' सलमान खानची झलक पाहायला मिळाली आहे. वास्तविक, या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान वरुण म्हणाला होता की, सलमान 'बेबी जॉन'मध्ये जो कॅमिओ करणार आहे तो प्रेक्षकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहील. वरुणचे हे विधान खरे ठरले आहे. पण सलमान आणि बेबी जॉनचे निर्माते ॲटली यांच्यातील हा करार केवळ एवढ्यापुरता मर्यादित नाही. ॲटली आणि सलमान खानची कथा वरुण धवनच्या 'बेबी जॉन'पासून सुरू झाली आहे. शाहरुख खानसोबत 'जवान'मध्ये काम केल्यानंतर ॲटली आता सलमान खानसोबत एका हिंदी चित्रपटात काम करत आहे.

ॲटलीला हवे असते तर तो 'बेबी जॉन'साठी शाहरुख खानचा कॅमिओ प्लॅन करू शकला असता. पण सलमान खानसोबतच्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी त्याने आतापासूनच वातावरणनिर्मिती करण्यास सुरूवात केली आहे. सलमान खानच्या कास्टिंगबद्दल बोलताना ॲटली म्हणाला की, मला वरुण धवनच्या चित्रपटात अशा अभिनेत्याला कास्ट करायचे आहे की त्याला पाहून लोक त्याचा आदर करतील. जो प्रत्येकाचा बॉस दिसतो. त्यामुळेच बेबी जॉनमध्ये सलमान खानसारख्या दमदार हिरोची एंट्री करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

Baby john and salman khan
Sonu Sood : सोनू सूदला आली सीएम आणि डेप्युटी सीएम होण्याची ऑफर; भीतीने दिला नकार

सलमान खानच्या चित्रपटाशी कनेक्शन

ॲटलीच्या आगामी चित्रपटाचे नाव सध्या 'ए६' आहे. या चित्रपटात सलमान खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच 'A6' बद्दल माहिती देताना ॲटली म्हणाले होते की, या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम जवळपास पूर्ण झाले आहे आणि त्यांच्या टीमने प्री-प्रॉडक्शनची तयारीही सुरू केली आहे. जरी ॲटली यांनी त्यांच्या चित्रपटाच्या कथेबद्दल काहीही उघड केले नाही. पण ते म्हणाले की अशा प्रकल्पांमध्ये वेळ खर्च होतो. पण प्रत्येक देशवासीयाला या चित्रपटाचा अभिमान वाटेल. लवकरच या चित्रपटाबाबत ॲटलीकडून मोठी घोषणा करण्यात येणार आहे.

Baby john and salman khan
Pravin Tarde-Snehal Tarde: कामासाठी वणवण, भाड्याचे घर, लग्नाला कुटुंबाचा विरोध, अशी आहे प्रवीण तरडे अन् स्नेहलची लव्हस्टोरी

माहितीनुसार, ॲटलीच्या चित्रपटात सलमान खानला मास हिरो म्हणून सादर केले जाईल आणि म्हणूनच त्याने 'बेबी जॉन' मधून सलमानच्या पुढील चित्रपटाची बांधणी सुरू केली आहे. सिंघममध्ये सलमानला मिळालेल्या स्क्रीनस्पेसमुळे निराश झालेले चाहते त्याच्या 'बेबी जॉन' कॅमिओमुळे खूप खूश आहेत. त्याचा हा सीन सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com