प्रवीण तरडे हा मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता, दिग्दर्शक आहे. त्याची बायको स्नेहलदेखील अभिनेत्री आहे.
प्रवीण तरडे यांनी एमबीए केलं. परंतु त्यांनी नोकरी सोडून प्रायोगिक नाटक करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्याकडे पैसेही नव्हते. ते गावोगावी जाऊन कलाकारांचा शोध घेतं असे.
पुण्यात प्रवीण कलाकारांच्या शोधात आला होता. तेव्हा त्यांची ओळख स्नेहल यांच्याशी झाले. नाटकांसाठी त्यांनी गावोगावी फिरायला लागयचे. तेव्हा ते बाईकवरुन एकत्र प्रवास करायचे.
याच काळात त्यांच्यात मैत्री झाली. पुढे या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.परंतु जेव्हा त्यांच्या लग्नाचा विषय आला तेव्हा मात्र घरातून विरोध होता.
प्रवीण करत असलेल्या नाटकांमधून फार पैसे मिळत नव्हते. त्यामुळे स्नेहलच्या कुटुंबाकडून त्यांच्या लग्नाला विरोध होता.
त्यामुळे प्रवीणने मिळेल ते काम करण्याचा निर्णय घेतला. त्याने चिन्मय मांडलेकरच्या मदतीने काम मिळवले. परंतु तेव्हा मालिकांच्या लेखनासाठी प्रवीणचे नाव देत नव्हते.
पुढे प्रवीणने अनेक वर्ष हे काम केले.त्याने १८-१८ तास इंडस्ट्रीमध्ये काम केले. त्यांनी भाड्याच्या घरात संसाराला सुरुवात केली.स्नेहलने करिअरला ब्रेक देत मुलांसाठी वेळ देण्याचा निर्णय घेतला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.