Baaghi 4 Saam Tv
मनोरंजन बातम्या

Baaghi 4 Review: टाइगर श्रॉफचा 'बागी ४' थिएटरमध्ये पास झाला की फेल? प्रेक्षकांनी दिले रिव्ह्यू

Baaghi 4 Public Review: टायगर श्रॉफ स्टारर 'बागी ४' हा चित्रपट आज थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात संजय दत्त एका भयानक खलनायकाची भूमिका साकारली आहे.

Shruti Vilas Kadam

Baaghi 4 Public Review: 'बागी ४' चित्रपटाची क्रेझ प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रेक्षकांमध्ये दिसून येत होती. या चित्रपटातील अ‍ॅक्शन आणि गाणी प्रेक्षकांना आवडत आहेत. पहिल्या दिवसाच्या शोनंतर, नेटकऱ्यांनी चित्रपटाचे रिव्ह्यू द्यायला सुरुवात केली. तर, जाणून घेऊयात प्रेक्षकांना 'बागी ४' चित्रपट कसा वाटला.

कथेचे कौतुक, याला टायगर श्रॉफचे परफॉरमन्स

एक्स (ट्विटर) अकाउंटवर 'बागी ४' चित्रपटाबाबत प्रेक्षक त्यांचे रिव्ह्यू देत आहेत. एका नेटकऱ्यांने चित्रपटाबद्दल लिहिले की, 'याची कथा 'बागी' फ्रँचायझीच्या इतर चित्रपटांपेक्षा चांगली आहे. चित्रपटाचे पहिले ३० मिनिटे थरारक आहेत.' दुसऱ्या नेटकऱ्यांने कमेंटमध्ये लिहिले की, 'चित्रपटाची गाणी, अ‍ॅक्शन, सर्व मिळून हा एक उत्तम मनोरंजन करणारा चित्रपट आहे.'

आणखी एका नेटकऱ्यांने टायगरच्या अभिनयाचे कौतुक केले आणि ट्विट केले की, 'टायगर श्रॉफचा रॉनीच्या भूमिकेत आश्चर्यचकित करतो. या चित्रपटाची कथा तुम्हाला तुमच्या जागेवर बांधून ठेवते. संजय दत्तचे पात्र चित्रपटातील थरार वाढवते.' काही नेटकऱ्यांनी या चित्रपटाला टायगर श्रॉफचा कमबॅक चित्रपट म्हटले आहे.

संजय दत्तचा अभिनय

'बागी ४' चित्रपटात टायगर श्रॉफचे फार कौतुक होत आहे. पण, खलनायकाच्या भूमिकेत संजय दत्तने सर्वांना थक्क केल आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एका नेटकऱ्यांने संजय दत्तच्या अभिनयाचे कौतुक केले. नेटकऱ्यांने लिहिले की, 'संजय दत्त जादूगार आहे, तो फक्त खलनायकाची भूमिका करत नाही, तर तो तुम्हाला त्याचा राग येण्यास भाग पाडतो आणि ही एका उत्तम अभिनेत्याचे चिन्ह आहे. 'बागी ४' मध्ये संजय दत्तच्या 'वास्तव' चित्रपटातील क्रूरता आणि भावनिकतेची झलक देखील दिसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

जिथं दहशत तिथंच धिंड, पुण्यात आरोपींना आणलं गुडघ्यावर|VIDEO

Maharashtra Live News Update: नांदेड जिल्ह्यात हवामान विभागाकडून उद्या ऑरेंज अलर्ट जारी

Horoscope Saturday: या राशींना मिळणार दुप्पट लाभ, हनुमानजी करणार अपार कृपा! वाचा शनिवारचे राशीभविष्य

Nilesh Ghaywal : निलेश घायवळ लंडनला पळाला; पुणे पोलीस आता संपूर्ण टोळीच्या नाड्या आवळणार, पुढचा प्लानही सांगितला

Pune Fire : पुण्यात भीषण दुर्घटना! १४ मजली इमारतीत आग, सिलेंडरचा स्फोट, १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ५ जखमी

SCROLL FOR NEXT