Dream Girl 2 Teaser Released Saam TV
मनोरंजन बातम्या

Ayushmann Khurrana Post : आयुष्मान खुरानाच्या 'पूजा'ने सगळ्यांना केलं घायाळ; 'दिल का टेलिफोन 2' पुन्हा प्रदर्शित

Dil Ka Telephone 2 Released : 'दिल का टेलिफोन 2' आयुष्यमानचे 'पूजा' हे पात्र रिव्हील झाले आहे.

Pooja Dange

Dream Girls 2 Song Dil Ka Telephone 2 Out :

अभिनेता आयुष्मान खुरानाचा आगामी चित्रपट 'ड्रीम गर्ल 2'मधील 'दिल का टेलिफोन 2' या हे गाणे प्रदर्शित झाले आहे . नुश्रत भरुच्चाच्या जागी, यावेळी अनन्या पांडे आयुष्मानच्या प्रियसीच्या भूमिकेत दिसत आहे. ड्रीम गर्लमधील पूजा म्हणजे ​​आयुष्मान त्याच्या फिमेल लूकमध्ये पुन्हा धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे.

'दिल का टेलिफोन 2' आयुष्यमानचे 'पूजा' हे पात्र रिव्हील झाले आहे. आयुष्मान आणि अनन्या पांडे एका नवीन हुक स्टेपसह करताना दिसत आहेत. तर गाण्याची चाल तशीच आहे. या गाण्यात अभिषेक बॅनर्जी, राजपाल यादव, विजय राज आणि मनजोत सिंग यांच्याही भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे गाणे मीट ब्रॉस आणि जोनिता गांधी या मूळ गायकांनी गायले आहे, तर जुबिन नौटियालने 2019 च्या मूळ गाण्यातील नकाश अझीझची जागा घेतली आहे. संगीत मीट ब्रदर्सचे आहे तर कुमार यांनी नवीन गीते लिहिली आहेत.

'ड्रीम गर्ल 2' या नवीन गाण्यावर चाहत्यांची प्रतिक्रिया

गाणे शेअर करताना आयुष्मान खुरानाने सोशल मीडियावर लिहिले, “आज तुमच्या हृदयाचा टेलीफोन वाजणार'. #DilKaTelephone2 गाणे आऊट! #25AugustHogaMast #DreamGirl2 25 ऑगस्ट रोजी सिनेमागृहात. गाण्यावर प्रतिक्रिया देताना, एका नेटकाऱ्याने कमेंट केली आहे, "पूजा सुप्रेमसी", "फँटॅस्टिक सॉंग," आणखी काही नेटकऱ्यांनी लिहिले आहे. “अनन्या का?” असे विचारात अनेकांनी मुळ जाण्याची तुलना नवीन गाण्याची केली आहे. (Latest Entertainment News)

ड्रीम गर्ल 2

ड्रीम गर्ल 2 हा आयुष्मानच्या अत्यंत यशस्वी चित्रपट ड्रीम गर्लचा सीक्वल आहे, जो 2019 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिक्वेलचे दिग्दर्शन राज शांडिल्य यांनी केले आहे. हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

WhatsApp New Feature: व्हॉट्सॲप चॅटमध्ये बदल होणार, वापरकर्त्यांना 'हे' नवीन अपडेट मिळणार

Pune Shocking: 'आई-बाबा माफ करा'! ७ व्या मजल्यावरून उडी मारण्यापूर्वी IT इंजिनिअर पियुषची भावनिक चिठ्ठी

Maharashtra Live News Update: भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिरात भाविकांच्या गर्दीचा उद्रेक

Government Employee : सरकारी कर्मचाऱ्यांनो, सोशल मीडिया वापरताना जरा जपून; अन्यथा कारवाई, नवी नियमावली आली!

Fried Rice Recipe: रात्रीचं जेवण बनवायचा कंटाळा आला आहे? 10 मिनिटांत बनवा हेल्दी आणि टेस्टी फ्राई़ड राईस

SCROLL FOR NEXT