Amitabh Bachchan Helped Ishaan Khatter :
बिग बी अभिताभ बच्चन यांचे अनेक किस्से आपण नेहमी ऐकत असतो. मग ते त्यांच्या सहकलाकारांकडून असोत नाहीतर फॅनकडून. आता त्यांचा एक किस्सा शाहिद कपूर भाऊ आणि अभिनेता ईशान खट्टर सांगितला आहे.
ईशान खट्टरने 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तो जान्हवी कपूरसोबत दिसला होता. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान ईशानने खुलासा केला की, अमिताभ बच्चन यांच्यामुळेच त्याला शाळेत अॅडमिशन मिळालं होतं.
अभिनेत्याने सांगितले की, तो पहिल्यांदा 'सूर्यवंशम' चित्रपटाच्या सेटवर बिग बींना भेटला होता. विशेष म्हणजे या चित्रपटात ईशानने बालकलाकार म्हणून काम केले होते. त्याचवेळी त्याचे वडील राजेश खट्टर आणि आई नीलिमा अझीम यांनीही चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत ईशानने सांगितले की बिग बींनी त्याला त्याच्या शाळेत अॅडमिशन मिळावे यासाठी खूप मदत केली. अभिनेत्याने सांगितले की, जेव्हा त्याची आई नीलिमा अझीम 'सूर्यवंशम'चे शूटिंग करत होती तेव्हा त्यांच्याकडे नानी नव्हती. ती ईशानला तिच्यासोबत सेटवर घेऊन जायची. (Latest Entertainment News)
अभिनेत्याने पुढे सांगितले की, एके दिवशी अमिताभ बच्चन सेटवर आले तेव्हा त्यांना पाहून ईशानने 'बले मियाँ बले मियाँ' (बडे मियाँ) ओरडायला सुरुवात केली. खरंतर याच काळात ईशानने 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट पाहिला होता. हे अमिताभ बच्चन यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर ईशान आणि त्यांची मैत्री झाली! चित्रपटाच्या सेटवर ईशान अनेकदा अमिताभ बच्चन यांची दाढी ओढायचा.
ईशानची आई नीलिमा यांना त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यास अडचण येत असल्याचेही ईशानने त्यावेळी त्यांनी सांगितले. बिग बींना जेव्हा ही गोष्ट कळली तेव्हा त्यांनी स्वतः जाऊन शाळा प्रशासनाशी बोलून ईशानला प्रवेश मिळवून दिला. ईशानने सांगितले की, त्याला स्वतःलाही ही गोष्ट माहीत नव्हती. एक दिवस अचानक त्याच्या आईने याविषयी बोसण्यास सुरुवात केली, तेव्हाच त्याला हे कळले.
ईशान खट्टर शेवटचा 'फोन भूत' चित्रपटात सिद्धांत चतुर्वेदी आणि कतरिना कैफसोबत दिसला होता. त्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ईशान लवकरच 'पिप्पा' चित्रपटात दिसणार आहे. 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटात ईशान ब्रिगेडियर बलराम सिंग मेहता यांची भूमिका साकणार आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.