Virat Kohli Avneet Kaur News saam tv
मनोरंजन बातम्या

Avneet Kaur: विराट कोहलीचा एका 'लाइक'; अवनीत कौरच्या करिअरला मिळालं नव वळण, एक रात्रीत बदललं आयुष्य

Virat Kohli Avneet Kaur News: विराट कोहलीच्या लाईकमुळे अवनीत कौरला खूप मोठा फायदा झाला आहे. अवनीत कौरचे एका रात्रीत आयुष्य बदलले असून यामुळे तिला कोट्यावधींचा फायदा झाला आहे.

Shruti Kadam

Virat Kohli Avneet Kaur News: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने अभिनेत्री अवनीत कौरच्या एका इंस्टाग्राम पोस्टला दिलेल्या 'लाइक'मुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली. या एका कृतीने अवनीतच्या इंस्टाग्राम फॉलोअर्समध्ये तब्बल 20 लाखांची वाढ झाली, आणि तिच्या ब्रँड व्हॅल्यूतही लक्षणीय वाढ झाली. या घटनेनंतर अवनीतच्या पोस्टची किंमत 2 लाख रुपयांवरून 2.6 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

विराट कोहलीने या 'लाइक'बाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, "फीड क्लिअर करताना इंस्टाग्रामच्या अल्गोरिदममुळे चुकून लाईक बटन दाबलं गेलं. यामागे कोणताही हेतू नव्हता." मात्र, या स्पष्टीकरणानंतरही सोशल मीडियावर चर्चा थांबली नाही. अनेकांनी यावर मीम्स तयार केले, आणि अवनीतच्या कमेंट सेक्शनमध्ये विराट कोहलीचे GIFs आणि कमेंट पाहायला मिळाल्या.

या अनपेक्षित प्रसिद्धीमुळे अवनीत कौरला विविध ब्रँड्सकडून 12 नवीन एंडोर्समेंट डील्स मिळाल्या आहेत, ज्यात ब्यूटी, फॅशन आणि फिनटेक क्षेत्रातील ब्रँड्सचा समावेश आहे. या संधींमुळे तिच्या एकूण कमाईतही लक्षणीय वाढ झाली आहे. 2024 मध्ये तिची नेट वर्थ अंदाजे 25 कोटी होते. परंतु या घटनेनंतर ते 43 कोटींपर्यंत वाढल्याचे अहवाल दर्शवतात. या संपूर्ण घटनेने सिद्ध केले की, सोशल मीडियावरील एक छोटीशी कृतीही कोणाच्या करिअरला मोठा वळण देऊ शकते.

अवनीत कौरने बाल कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती, आता अवनीत 'लव्ह इन व्हिएतनाम' या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तसेच, ती 'मिशन: इम्पॉसिबल – द फायनल रेकनिंग' या हॉलिवूड चित्रपटात टॉम क्रूझसोबत दिसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचं आंदोलन

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

SCROLL FOR NEXT