Avika Gor SaamTv
मनोरंजन बातम्या

Famous Actress Hospitalised: १०४ ताप, चेहरा थकलेला...; प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली, तातडीने केलं रुग्णालयात दाखल

Avika Gor: अविका गौरला डेंग्यूची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या प्रकृतीची माहिती समोर येताच चाहत्यांनी चिंता व्यक्त करत लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना केली.

Shruti Vilas Kadam

Avika Gor: ‘बालिका वधू’ मालिकेतील आनंदी या भूमिकेमुळे घराघरात पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री अविका गौर सध्या आजारी असून तिला डेंग्यूची लागण झाली आहे. प्रकृती बिघडल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अविकाच्या तब्येतीची माहिती समोर आल्यानंतर तिचे चाहते चिंतेत असून, ती लवकर बरी व्हावी यासाठी सोशल मीडियावरून प्रार्थना करत आहेत.

अविकाच्या प्रकृतीबाबत तिच्या पतीने माहिती दिली आहे. अविकाला शूटिंगदरम्यान प्रचंड ताप आला होता. मात्र, तब्येत ठीक नसतानाही तिने काम थांबवले नाही. तब्बल १०४ डिग्री ताप असतानाही तिने शूटिंग केल्याचे तिच्या पतीने सांगितले.

अविका गौर गेल्या काही काळापासून विविध प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. ‘बालिका वधू’मधील बालकलाकार म्हणून तिने आपल्या अभिनयाची सुरुवात केली आणि आनंदीच्या भूमिकेमुळे तिला मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिने हिंदी टीव्ही मालिकांसोबतच रिअॅलिटी शो आणि इतर मनोरंजन प्रोजेक्ट्समध्येही काम केले आहे. २०२६ मध्ये ती ‘खतरों के खिलाड़ी 15’मध्येही सहभागी झाली होती.

लग्नानंतर अविका पती मिलिंद चंदवानीसोबत बँकॉकमध्ये शिफ्ट झाली आहे. मात्र, परदेशात राहूनही तिचे काम सुरूच आहे. ती कामासाठी सतत भारतात येत असते. सध्या ती रुग्णालयात उपचार घेत असून, तिची प्रकृती लवकर सुधारावी अशीच तिच्या चाहत्यांची इच्छा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला धोका, ते काहीही करू शकतात; आईने पोलिसांवर केले गंभीर आरोप

Rajgad Tragedy : राजगडावर मोठी दुर्घटना! ट्रेंकिंग करताना तरुण अचानक कोसळला अन्...

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Cucumber : काकडी खाताना तुम्ही नकळत करताय 'ही' चूक, वेळीच ओळखा अन् गंभीर समस्यांपासून वाचा

Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना! धावत्या रुग्णवाहिकेतून रुग्ण खाली पडला

SCROLL FOR NEXT