Athiya shetty  google
मनोरंजन बातम्या

Athiya shetty outfits : आथिया शेट्टीचा हटके किलर लूक पहिला का?

अलीकडेच, केएल राहुलची पत्नी अथिया शेट्टी एका फॅशन इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती, यावेळी तिने पँट सूट घातला होता, या मध्ये तिचा हटके बॉस लेडी लूक दिसला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भारतीय क्रिकेटर लोकेश राहुल उर्फ ​​केएल राहुलचा सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सोबत विवाह झाला आहे. अथिया शेट्टीने नुकतचं एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे तिच्या गरोदरपणाची गोड बातमी दिली आहे. आता अलीकडेच तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा झाल्यानंतर अथिया एका ब्युटी इव्हेंटमध्ये दिसली. यावेळी तिने रिमझिम दादूचा कस्टम केलेला ड्रेस घातला होता ज्यामध्ये तिचा बॉस लेडी लूक दिसला.

अथियाचा हा लूक तिच्या स्टायलिस्ट राहुल विजयने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.  त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ' अथियाला मेन्सवेअर कपडे शोभून दिसतात. रिमझिम दादूने कस्टम केलेला आयवरी रंगाचा पँट सेट आणि ब्लेझर होता. रिमझिम दादूच्या नवीन कॉउचर कलेक्शनमधील ब्लेझर आणि पँट सेट, स्टुको मेन्सवेअरचं कस्टम वर्जन आहे.

सूटमध्ये आयवरी रंगाचा जॅकेट होत, जे टॉपलेस ब्लेझरमध्ये अथियाचा किलर लूक दिसत होता. यात एक शाल लॅपल आहे जो स्कार्फ सारखा फील देण्यासाठी समोरच्या बाजूने पसरलेला होता. फुल स्लीव्हज, सॉफ्ट शोल्डर, व्ही नेकलाइन आणि एम्ब्रॉयडरीने तिच्या डिझायनर पँट सेटचं आकर्षण वाढवणार होता.

कानातले आणि मेकअप खास होता

तिने सेरुलियन निळ्या स्टोननी सजवलेल्या स्टेटमेंट इअरिंग्ससह सर्व पांढऱ्या रंगाचा लूक केला होता. लुकची जोडणी केली. स्टेटमेंट रिंग, व्हाईट स्टिलेटोस आणि वाईन रेड नखांना आकर्षक केलं होत. अथियाने तिचे केस मधून वेगळे केले होते आणि स्लीक बन बनवलं होते. ग्लॅमरसाठी, तिने तिच्या गालांवर गुलाबी रुज, गुलाबी रंगाचा आयशाडो आणि थोडा मस्करा लावला होता. प्रेग्नेंसी ग्लोमुळे तिचा लूक आणखी आकर्षक दिसत होता.

Edited by - Archana Chavan

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT