Childrens Day Special
Childrens Day SpecialSaam Tv

Childrens Day Special: आईबाप भारी अन् लेकरं त्यांच्यापेक्षाही लयभारी! या बॉलिवूड कलाकारांची मुलं सोशल मीडियावर आहेत प्रसिद्

Celebrites Famous Children: बॉलिवूड कलाकारांच्या प्रसिद्ध स्टार किंड्सची ओळख करून देणार आहोत. जे लहान वयातच खुप लोकप्रिय आहेत.
Published on

१४ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात बालदिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतात बालदिन साजरा केला जातो. नेहरूंना लहान मुलं फार आवडायची म्हणून जवाहरलाल नेहरूंच्या मृत्यूनंतर त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बालदिन दिवस साजरा केला जातो.

Childrens Day Special
Suraj Chavan Dance: बिग बॉस फेम सूरजचा नाद नाय! 'तांबडी चामडी' गाण्यावर केला डान्स; Video व्हायरल

बालदिन दिवशी सर्वसामान्य ते कलाकार मंडळी सर्वजण सोशल मीडियावर फोटो पोस्ट करतात. लहानपणीच्या सुंदर फोटोंना शेअर करतात. याचनिमित्ताने आज बालदिनानिमित्त बॉलिवूड कलाकारांच्या प्रसिद्ध स्टार किंड्सची ओळख करून देणार आहोत. जे लहान वयातच खुप लोकप्रिय आहेत.

Childrens Day Special
Laapataa Ladies : ऑस्करसाठी 'लापता लेडीज'च्या दिग्दर्शकाने घेतला मोठा निर्णय, थेट नावचं बदललं

तैमूर कपूर

सैफ अली खान आणि करिना कपूर यांचा मुलगा तैमूर हा लहानपणापासूनच सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. अनेकदा तैमूर त्याच्या क्युटनेसने नेटकऱ्यांची मने जिंकतो. तर कधी त्यांच्या स्वभावामुळे.

लक्ष्य सिंह लिंबाचिया

भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांचा मुलगा लक्ष्य हा खुप लोकप्रिय आहे. भारती त्याला प्रेमाने गोला म्हणते. गोलाचे अनेक व्हिडीओ, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

राहा भट्ट

बॉलिवूडची प्रसिद्ध जोडी आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची मुलगी राहा दिसताच चाहत्यांची एकच गर्दी होते. गोंडस आणि निरागस चेहऱ्यांने राहा चाहत्यांची लाडकी बनली आहे. सोशल मीडियावर अनेकदा आलिया आणि रणबीरसोबत राहाला स्पॉट केले जाते.

राहिल आणि रियान

रितेश-जिनिलिया हे बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी आहे. त्यामुळे या दोघांचे अनेकदा फोटो अनेकदा व्हायरल होतात. या दोघांना राहिल आणि रियान ही दोन मुले आहेत. या सेलिब्रिटी कपल्सची मुलं म्हणून नाहीतर संस्काराची योग्य शिकवण अशी ओळख म्हणून रितेश आणि जेनेलिया यांच्या मुलांकडे पाहिले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com