Athang Web Series Saam Tv
मनोरंजन बातम्या

Athang Web Series: वाड्यातील गूढ उलगडले...; मराठी वेबसीरीज 'अथांग'नं विक्रम मोडला

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इतके रेकॅार्ड ब्रेक यश मिळवणारी ही प्लॅनेट मराठी ओटीटीवरील पहिलीच वेबसीरिज ठरली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Athang Web Series: प्लॅनेट मराठी ओटीटीवर प्रदर्शित झालेली जयंत पवार दिग्दर्शित 'अथांग' वेबसीरिजने प्रेक्षकांचे मन जिंकले. या वेबसीरिजचे पहिले दोन भाग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून या रहस्यमय वाड्याचे दरवाजे आता उघडले आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी इतके रेकॅार्ड ब्रेक यश मिळवणारी ही प्लॅनेट मराठी ओटीटीवरील पहिलीच वेबसीरिज ठरली आहे.

पहिल्याच दिवशी मोठ्या संख्येने प्रेक्षकांनी ‘अथांग’ ही वेबसीरिज पाहिली. या वाड्यातील गूढ हळूहळू उडगडत असतानाच प्रेक्षकांना आगामी भागांची उत्सुकता वाढली आहे.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, "पहिल्याच दिवशी वेबसीरिजला मिळालेला प्रतिसाद पाहता आनंदाला उधाण आले आहे. ‘अथांग’ला प्रेक्षकांची पसंती मिळणार, हे ठाऊक होते. परंतू इतकी रेकॉर्ड ब्रेक कमाई होईल असे वाटले नव्हते. प्रेक्षकांच्या प्रेमामुळेच आम्हाला असा आशय प्रदर्शित करण्यासाठी प्रेरणा आणि उर्जा मिळते."

निर्माती तेजस्विनी पंडित म्हणते, "आज माझ्या मनात काय भावना आहेत, त्या शब्दात व्यक्त करण्यासारख्या नाहीत. निर्माती म्हणून हा माझा पहिलाच प्रोजेक्ट. त्यामुळे हा माझ्यासाठी आनंददायी क्षण आहे. मात्र याचे सारे श्रेय ‘अथांग’च्या संपूर्ण टीमला जाते. यामागे सगळ्यांचीच मेहनत आहे. प्रेक्षकांच्या खूप सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. प्रेक्षक आता पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहेत."

'अथांग' या वेबसिरीजमध्ये  संदीप खरे, निवेदिता जोशी - सराफ, धैर्य घोलप, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चौक आणि रसिका वखारकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन निर्मित, अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत 'अथांग'चे तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्माते आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai High Court: कबुतरखान्यावरून मराठीविरुद्ध जैन; हायकोर्टाकडून बंदी कायम

Adult Video: शाळेच्या वर्ग सुरू असतानाच एलईडी स्क्रीनवर लागला पॉर्न; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Hair Care Tips: आठवड्यातून केसांना कितीवेळा तेल लावावे?

Tuljapur Tulja Bhavani Mandir : तुळजा भवानी मंदिराचा गाभारा पाडणार? मंदिर जीर्णोद्धावरुन तुळजापुरात राडा

Pune Crime: पैशांची मागणी, वारंवार शिवीगाळ; तरुणीचं डोकं फिरलं, रॉडने मारहाण करत तरुणाला संपवलं

SCROLL FOR NEXT