Ashok Saraf and Sankarshan Karhade: मराठी मनोरंजनविश्वात एक मोठी आणि उत्सुकता वाढवणारी बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आणि ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ लवकरच एका नव्या प्रोजेक्टमध्ये एकत्र झळकणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.
संकर्षण कऱ्हाडेने स्वतः सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत या नव्या प्रोजेक्टचा संकेत दिला. त्याने अशोक सराफ यांच्यासोबतचा फोटो पोस्ट करत एक मजेशीर कॅप्शन लिहिले. “द ग्रेट अशोक सरांसोबत मी काम केलं तर; आम्हाला दोघांना एकत्रं पहायला आवडेल का हो तुम्हाला…??? आधी तुम्ही खरं सांगा… मग मी तुम्हाला सगळं खरं खरं काय ते सांगतो… ” असे कॅप्शन लिहत त्याने चाहत्यांची उत्सुकता वाढवली आहे.
सध्या या प्रोजेक्टबाबत अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नसली तरी, संकर्षण आणि अशोक सराफ एकत्र काम करणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. हा प्रोजेक्ट चित्रपट, नाटक किंवा वेब माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार का, याबाबत मात्र अजूनही सस्पेन्स कायम आहे.
दरम्यान, अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक गाजलेले चित्रपट आणि भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. आजही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. दुसरीकडे, संकर्षण कऱ्हाडेनेही नाटक, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमांत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोन्ही पिढ्यांतील कलाकार एकत्र येणार असल्यामुळे हा प्रोजेक्ट विशेष ठरणार आहे. आता या नव्या कलाकृतीची अधिकृत घोषणा कधी होणार आणि नेमकं काय सरप्राईज प्रेक्षकांसाठी असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.