Actress Death: ब्रिटिश चित्रपट व दूरचित्रवाणी क्षेत्रातील ज्येष्ठ अभिनेत्री एल्सी केली यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वात शोककळा पसरली असून चाहत्यांसह सहकलाकारांकडून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली जात आहे.
एल्सी केली यांचे २१ एप्रिल २०२६ रोजी अल्पशा आजारामुळे राहत्या घरी निधन झाले. एल्सी केली यांनी पाच दशकांहून अधिक काळ अभिनय क्षेत्रात काम करत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी दूरचित्रवाणी, रंगभूमी आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. त्यांच्या सहज अभिनयशैलीमुळे आणि विनोदी टायमिंगमुळे त्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या होत्या.
त्यांना विशेष लोकप्रियता मिळाली ती बेनिडोर्म या लोकप्रिय सिटकॉममधील “नोरीन माल्टबी” या भूमिकेमुळे. या पात्रामुळे त्या घराघरांत पोहोचल्या आणि प्रेक्षकांच्या मनात कायमस्वरूपी स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनानंतर सहकलाकार आणि दिग्दर्शकांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. अनेकांनी त्यांना “उत्कृष्ट अभिनेत्री”, “कॉमिक जीनियस” आणि “प्रेमळ व्यक्तिमत्त्व” म्हणून श्रद्धांजली वाहिली.
एल्सी केली यांनी क्रॉसरोड्स, द फेमस फाइव्ह, हॅरी अँड द रिंकलीज यांसारख्या अनेक प्रसिद्ध कार्यक्रमांमध्ये काम केले होते. त्यांच्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी प्रेक्षकांना हसवले, भावूक केले आणि मनोरंजनाची समृद्ध परंपरा निर्माण केली. त्यांच्या निधनाने मनोरंजन विश्वातील एक युग संपल्याची भावना व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.