Ashok Ma. Ma SAAM TV
मनोरंजन बातम्या

Ashok Ma. Ma : 'अशोक मा.मा.' मालिकेत 'या' अभिनेत्याची दमदार एन्ट्री, नात्यांची समीकरणं बदलणार का? पाहा VIDEO

Ashok Ma. Ma Serial Update : 'अशोक मा.मा.' मालिकेत आता नवीन अभिनेत्याची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे मालिका आता नेमकं कोणते वळण घेणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

Shreya Maskar

'अशोक मा.मा.' (Ashok Ma. Ma) मालिका आता रंजक वळणावर आली आहे. या मालिकेत रोज काहीतरी नवीन पाहायला मिळत आहे. आता मालिकेत नवीन एन्ट्री झाली आहे. 'अशोक मा.मा.' ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रत्येक पात्राचं नातेसंबंधातील गुंतागुंतीचं आणि भावनिक प्रवास प्रेक्षकांना भुरळ घालतात. आता या प्रवासात एक नवं वळण येणार आहे. भैरवीचा जुना मित्र 'अर्जुन बेलवलकर' तिचा बॉस म्हणून मालिकेत येणार आहे. अर्जुनच्या येण्याने मालिका कोणते वळण घेणार, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

अर्जुनची भूमिका कलर्स मराठीवरील 'पिरतीचा वनवा उरी पेटला' मालिकेतील इंद्रनील कामत (Indraneil Kamat ) साकारणार आहे. भैरवी म्हणजेच रसिक वाखारकर पिरतीचा वनवा उरी पेटला मालिकेत सावीच्या भूमिके दिसली होती. तेव्हा अर्जुन आणि सावीला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. आता देखील रसिक प्रेक्षक यांना 'अशोक मा.मा.' मालिकेत एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

भैरवी आणि अर्जुन हे शाळेपासूनचे वर्गमित्र आहेत. दोघे एकमेकांना प्रेमाने 'करकटक' आणि 'कंपास' अशा टोपणनावांनी हाक मारायचे. शाळेनंतर आता अनेक वर्षांनी अर्जुन तिच्या ऑफिसमध्ये सीनियर म्हणून येतो आणि भैरवीच्या समोर उभा राहतो. परदेशात शिकलेला, उत्साही, बडबड्या आणि अत्यंत स्मार्ट असा अर्जुन आहे. ऑफिसमध्ये त्याचा अंदाज थोडा खडूस वाटतो. भैरवी आणि अर्जुनमधील मोकळेपणा, जुन्या आठवणी पाहून अनिशच्या मनात असुरक्षिततेचं वादळ निर्माण होतं.

आत्तापर्यंत घरात 'अशोक मामा' बॉस होते, आता ऑफिसमध्ये भैरवी बॉस झाली आहे. अशोक मामा आणि भैरवीचं नातं सुधारले असतानाच अर्जुनची एन्ट्री त्यांच्या आयुष्यात झाली आहे. आता नात्यांची समीकरणं बदलणार का? जुन्या मैत्रीतून काही नव्याने फुलणार का? अनिश आणि भैरवीचं नात्याचे पुढे काय होणार, हे सर्व पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'अशोक मा.मा.' मालिकेचा महारविवारी विशेष एका तासाचा भाग दाखवण्यात येणार आहे. हा एपिसोड कलर्स मराठीवर दुपारी 2 वाजता आणि रात्री 8 वाजता पाहायला मिळेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

FSSAI pan masala rules: पान मसाल्याचे प्लास्टिक पाउच होणार बंद; FSSAIचा मोठा निर्णय

Maharashtra News Live Update : घाटकोपरमध्ये दरड कोसळली, 6 जणांचा मृत्यू

Delhi Pune Flight : दिल्ली - पुणे विमानात भयंकर घडलं! प्रवाशांची घुसमट झाली, घाम फुटला अन्...

Sleeping : पावसाळ्यात रात्री डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपताय? सावधान! शरीरावर होतायेत 'हे' गंभीर परिणाम

Petrol and Diesel Prices : पेट्रोल-डिझेल अचानक महागले; या राज्य सरकारने लावला 'विशेष सेस', नवी दरवाढ लागू

SCROLL FOR NEXT