'No Entry 2'मधून दिलजीत दोसांझची एक्झिट, नेमकं कारण काय?

Diljit Dosanjh : गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझने 'नो एन्ट्री 2' मधून माघार घेतली आहे. या मागचे मुख्य कारण, जाणून घेऊयात.
Diljit Dosanjh
No Entry 2SAAM TV
Published On

सध्या सोशल मीडियावर 'नो एन्ट्री' चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. 'नो एन्ट्री 2 ' चित्रपटाचा सीक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. 'नो एन्ट्री 2'मध्ये (No Entry 2) वरुण धवन, अर्जुन कपूर आणि दिलजीत दोसांझ हे तगडे कलाकार पाहायला मिळणार आहेत. चाहते यांच्या चित्रपटासाठी खूप उत्सुक असल्याचे दिसत आहे. मात्र आता या चित्रपटातून एका मोठ्या अभिनेत्याने माघार घेतली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून गायक दिलजीत दोसांझ (Diljit Dosanjh) आहे.

'नो एन्ट्री 2' चित्रपटातून दिलजीत दोसांझ याने एक्झिट घेतली आहे. या बातमीमुळे दिलजीतचे चाहते नाराज झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, दिलजीत दोसांझ वरुण धवन आणि अर्जुन कपूरसोबत काम करण्यास उत्सुक होता. परंतु दिलजीत दोसांझला चित्रपटाच्या क्रिएटिव्ह कल्पना पटली नाही आहे. त्याची मते थोडी वेगळी आहेत.

क्रिएटिव्ह मतभेदांमुळे दिलजीत दोसांझ याने 'नो एन्ट्री 2' चित्रपटातून माघार घेतली आहे. दिलजीत दोसांझला चित्रपटाचा कंटेंट आवडला नाही असल्याचे म्हटले जात आहे. त्याला त्याचे पात्र आणि स्क्रिप्ट अजून चांगली हवी होती. मात्र त्याचे हे मत 'नो एन्ट्री 2' चित्रपटाच्या टीमला न पटल्यामुळे त्याने 'नो एन्ट्री 2' चित्रपटातून निरोप घेतला आहे.

'नो एन्ट्री 2' हा कॉमेडी चित्रपट आहे. 'नो एन्ट्री 2' अनीस बज्मी दिग्दर्शित चित्रपट आहे. दिलजीत दोसांझच्या चित्रपटातील एक्झिटनंतर त्याची जागा कोण घेणार ही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. मात्र याबाबत अद्याप कोणताही खुलासा झाला नाही आहे. चाहते आता तिसरा अभिनेता कोण असणार, हे जाणून घेण्यात आतुर आहेत.

दिलजीत दोसांझ एक उत्तम गायक देखील आहे. त्याने आपल्या आवाजाने चाहत्यांना वेड लावले आहे. दिलजीत दोसांझ कायम त्याच्या म्युझिक कॉन्सर्टमुळे चर्चेत असतो. दिलजीत दोसांझचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे इन्स्टाग्राम 25.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. आपल्या गाण्याचे व्हिडीओ दिलजीत सतत चाहत्यांसोबत शेअर करत असतो. त्याच्या कॉन्सर्टला चाहत्यांची गर्दी पाहायला मिळते. आता दिलजीतचे चाहते त्याच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Diljit Dosanjh
Irina Rudakova : 'बिग बॉस' फेम 'परदेसी गर्ल'चं नशीब फळफळलं; Housefull 5 मध्ये अक्षय कुमारबरोबर झळकली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com